ये घबराने का वक्त नही, एक दुसरे का हौसला बढाने का है, म्हणत अक्षय कुमारने व्हिडीओ केला शेअर,एकदा पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 06:40 PM2020-06-02T18:40:35+5:302020-06-02T18:51:57+5:30
उठा आणि कामाला सुरूवात करा असे सांगत अक्षय कुमारही पुढे आला आहे.
कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे देशात सुरु असलेला लॉकडाऊनला केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत वाढवले आहे. याबाबत केंद्राने शनिवारीच आपली नियमावली जाहीर केली.केंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार, कंटेनमेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, पण त्याबाहेर अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे.
''कोरोना से डरोना'' योग्य काळजी घेतल्यास कोरोनापासून आपण सुरक्षित राहु शकतो. त्यामुळे ''घरात राहा, सुरक्षित राहा'' हे आता झाले. कोरोनासह जगण्यासाठी आता विविध गोष्टी सांगत नागरिकांना पुन्हा एकदा त्यांचे कामकाज सुरू करण्यासाठी एक नवीन बळ देण्याचा प्रयत्न विविध स्तरांतून होत आहे. त्यामुळे उठा आणि कामाला सुरूवात करा असे सांगत अक्षय कुमारही पुढे आला आहे.
अक्षय कुमारने एक व्हिडीओ बनवला आहे. यांत त्याने कामकाज सुरू करण्याची गरज आहे. पण स्वतःला एक शीस्त लावली तर आपण सुरक्षित राहु शकतो असे सांगितले आहे. सोशल डिस्टंसिंग, मास्क लावणे, वेळोवेळी हात धुवत राहणे या गोष्टी केल्याने कोरोनाचा धोका आपण टाळु शकतो असेही सांगण्यात आले आहे. अक्षयचा हा व्हिडीओ सा-यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.
त्यामुळे लॉकडाऊनमध्ये घरात राहून आपण सा-यांनी जबाबदारी पार पाडली त्याच प्रमाणे देश आता अनलॉक होत असताना ''आवश्यक असल्यास बाहेर पडा पण खबरदारी पाळा'' असा संदेशच यातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.