'स्त्री ३'मध्ये अक्षय कुमारची एंट्री, दिनेश विजानने अभिनेत्याला संबोधले हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सचा 'थानोस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 09:56 IST2025-01-06T09:55:46+5:302025-01-06T09:56:27+5:30

Akshay Kumar : अक्षय कुमारने 'स्त्री २'मध्ये एक छोटीशी भूमिका साकारली होती.

Akshay Kumar's entry in 'Stree 3', Dinesh Vijan calls the actor the 'Thanos' of the horror-comedy universe | 'स्त्री ३'मध्ये अक्षय कुमारची एंट्री, दिनेश विजानने अभिनेत्याला संबोधले हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सचा 'थानोस'

'स्त्री ३'मध्ये अक्षय कुमारची एंट्री, दिनेश विजानने अभिनेत्याला संबोधले हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सचा 'थानोस'

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार(Akshay Kumar)चे गेल्या वर्षी 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'सरफिरा, 'खेल खेल में' आणि 'सिंघम अगेन' असे चार चित्रपट प्रदर्शित झाले. यापैकी फक्त 'सिंघम अगेन'लाच यश मिळाले. याशिवाय अक्षयने 'स्त्री २' (Stree 2 Movie) या चित्रपटात एक कॅमिओ देखील केला होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला आणि खूप चर्चा झाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त हिट ठरला. ८०० कोटींहून अधिक कमाई करून हा चित्रपट आतापर्यंत बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात अक्षयने सरकटाच्या वंशजाची भूमिका साकारली होती. अशा परिस्थितीत आता चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की अक्षय 'स्त्री ३' मध्ये दिसणार का? त्याची भूमिका मोठी असेल का? अलिकडेच मॅडॉक फिल्म्सने आपल्या नवीन चित्रपटांची घोषणा केली आणि सांगितले की 'स्त्री ३' (Stree 3 Movie) ऑगस्ट २०२८ मध्ये प्रदर्शित होईल.

'स्काय फोर्स'च्या ट्रेलर लॉंचवेळी अक्षय कुमारने दिनेश विजानसोबतचा त्याचा 'दीड' चित्रपट असे वर्णन केले. जेव्हा त्याला विचारण्यात आले की तो या हॉरर-कॉमेडी विश्वाचा एक भाग बनणार का? तर तो म्हणाला, 'काय बोलू?' हे निर्माते दिनेश विजान आणि ज्योती देशपांडे ठरवतील. ते पैसे गुंतवणार असून अमर कौशिक यांना दिग्दर्शन करायचे आहे. अक्षयचे बोलणे संपल्यावर दिनेशने त्याला दुजोरा दिला आणि म्हणाला, 'नक्कीच, तो या विश्वाचा एक भाग आहे! तो आमचा थानोस आहे'.

'स्त्री २'मध्ये अक्षयचा कॅमिओ
अक्षयने 'स्त्री २'मध्ये एक छोटीशी भूमिका साकारली होती, ज्यामध्ये तो मानसिक आजारी असलेल्या रुग्णालयात दाखल आहे. तसेच त्याचे नावही समोर आले नाही. चित्रपटात, त्याचे वर्णन सरकटाच्या कुळातील शेवटचे सदस्य म्हणून केले गेले आहे, ज्याच्याकडे त्याचा नाश करण्याची चावी आहे. आता भविष्यात अक्षय एका सोलो हॉरर-कॉमेडी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे, ज्याबद्दल त्याच्या चाहत्यांनाही उत्सुकता आहे.

अक्षय व्यतिरिक्त वरुण धवनचा होता केमिओ
'स्त्री २' गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रिलीज झाला होता. अमर कौशिक दिग्दर्शित, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे दीड महिने वर्चस्व गाजवले आणि भारतात ६०० कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराणा यांच्याही मुख्य भूमिका होत्या. अक्षय व्यतिरिक्त या चित्रपटात वरुण धवनच्या 'भेडिया'चा एक कॅमिओ देखील होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता.

Web Title: Akshay Kumar's entry in 'Stree 3', Dinesh Vijan calls the actor the 'Thanos' of the horror-comedy universe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.