अक्षयकुमारच्या चाहत्यांनी राज ठाकरे यांना विचारले काही प्रश्न; सोशल मीडियावर रणकंदन!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 01:20 PM2018-03-21T13:20:02+5:302018-03-21T19:11:33+5:30

गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपासह अभिनेता अक्षयकुमारवर ...

Akshay Kumar's fans asked Raj Thackeray some questions; Crushing on social media! | अक्षयकुमारच्या चाहत्यांनी राज ठाकरे यांना विचारले काही प्रश्न; सोशल मीडियावर रणकंदन!

अक्षयकुमारच्या चाहत्यांनी राज ठाकरे यांना विचारले काही प्रश्न; सोशल मीडियावर रणकंदन!

googlenewsNext
ढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपासह अभिनेता अक्षयकुमारवर तोफ डागली होती. देशभक्तीचा आव आणणारा अक्षयकुमार सरकार पुरस्कृत चित्रपट करीत आहे. ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ आणि ‘पॅडमॅन’ हे चित्रपट त्याचेच प्रतीक आहे. अक्षयकुमार जबरदस्तीने भारतकुमार बनण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवाय तो भारतीय नागरिकही नसून, त्याचे नागरिकत्व कॅनडाचे आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. आता याच मुद्द्यावरून सध्या सोशल मीडियावर रणकंदन निर्माण झाले आहे. अक्षयकुमारच्या चाहत्यांनी त्याच्या देशप्रेमाबद्दलची अनेक उदाहरणे सांगताना राज ठाकरे यांच्यासमोर काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. त्याबाबतची एक पोस्टच सध्या सोशल मीडियावर वाºयासारखी व्हायरल होत आहे. 

पोस्टच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांचे अभिनंदन करताना, शिवतीर्थावर तुम्ही मांडलेले मुद्दे खूपच प्रभावी असून, ते खरंच अंमलात आणल्यास महाराष्ट्रात खूप चांगला बदल घडून येईल असे म्हटले. मात्र त्याचबरोबर अक्षयकुमारच्या नागरिकत्वाबद्दल केलेला भाषणातील उल्लेख खरंच योग्य आहे काय, असा प्रश्नही उपस्थित केला. अक्षयकुमार हा नागरिकत्वाने कॅनेडियन आहे. अक्षयकुमारचा अभिनय, तसेच भारत आणि कॅनडामधील त्याचे सामाजिक काम बघून त्याला कॅनडा सरकारने २००८ साली ‘आॅनररी डॉक्टरेट’ या मानद पदवीने गौरविले आहे. 

अक्षयकुमारने भारत देशासह महाराष्ट्रासाठी केलेली मदत खूप काही सांगून जाते. खरं तर अक्षयचे काम बघून सर्वच क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांनी त्याची पाठ थोपटायला हवी. पण, राज ठाकरे यांनी त्याच्या कामाचा साधा उल्लेखही केला नसल्याने खेद होत असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर अक्षय हा भारतीय नसून कॅनेडियन असल्याची माहिती जशी तुम्ही प्राप्त केली तशीच माहिती त्याच्या कामाबद्दल शोधून काढली असती तर ते अधिक योग्य आणि सकारात्मक झाले असते, असा उल्लेखही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तसेच अक्षयने आतापर्यंत केलेल्या कामांची लांबलचक यादीही या पोस्टमध्ये बघावयास मिळत आहे. ती खालीलप्रमाणे...

१) महाराष्ट्रातील दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या १८० कुटुंबांना ९० लाख रुपये मदत म्हणून दिले. 

२) सलमान खानच्या बिइंग ह्यूमन या सामाजिक संस्थेला ५० लाख रुपयांची मदत दिली.

३) चेन्नईतील पूरग्रस्तांना एक कोटी रु पयांची मदत दिली.

४) अक्षयकुमार कित्येक वर्षांपासून मुंबईत महिलांसाठी सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग मोफत देतोय. आतापर्यंत तब्बल पाच हजारांहून अधिक महिलांना त्याने ट्रेन केले आहे. 

५) आॅगस्ट २०१६ मध्ये शहीद जवानांच्या (बीएसएफ) कुटुंबांना ८० लाख रुपयांची मदत केली. 

६) मार्च २०१७ मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या (सीआरपीएफ) कुटुंबांना १ कोटी ८ लाख रुपयांची मदत केली. (बारा कुटुंबांना प्रत्येकी नऊ लाख रु पये.)

७) नोव्हेंबर २०१६ मध्ये जेव्हा अक्षयकुमारला विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे समजले, तेव्हा त्याने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन हे गाव दत्तक घेतले. 

८) शहीद जवानांच्या कुटुंबांना मदत व्हावी म्हणून --- या नावाने वेब पोर्टल सुरू केले, जेणेकरून प्रत्येक कुटुंबाला १५ लाख रुपये मदत मिळेल. 

९) एप्रिल २०१७ मध्ये चित्रपटांमध्ये जे डब रोल करून जिवाची बाजी लावत अ‍ॅक्शन स्टंट करतात, त्यांच्यासाठी प्रत्येकी सहा लाखांचा मेडिकल इन्शुरन्स सुरू केला. 

१०) गेल्या दिवाळीत एकूण १०३ शहीद जवानांच्या घरी अक्षयकुमारने दिवाळी फराळ आणि २५ हजार रुपयांचा धनादेश भेट म्हणून दिला. 

अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अक्षयकुमारचे चाहते आणि मनसे समर्थक यांच्यात शाब्दिक चकमक बघावयास मिळत आहे. 

Web Title: Akshay Kumar's fans asked Raj Thackeray some questions; Crushing on social media!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.