हेरा फेरी 3 या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आणखी दोन वर्षं?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 02:11 PM2018-09-29T14:11:13+5:302018-09-29T19:00:00+5:30
हेरी फेरी या चित्रपटानंतर हेरा फेरी ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात देखील सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल झळकणार आहेत. या चित्रपटाच्या कथेची केवळ एक लाइन ऐकून त्या तिघांनी या चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे.
हेरा फेरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या तिकडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. या चित्रपटातील तिघांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटातील अनेक संवाद तर आजही प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत. या चित्रपटाच्या यशानंतर याच तिकीडीला घेऊन निर्मात्यांनी फिर हेरा फेरी हा हेरी फेरीचा दुसरा भाग बनवला होता. हा चित्रपटदेखील प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.
हेरी फेरी या चित्रपटानंतर हेरा फेरी ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात देखील सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल झळकणार आहेत. या चित्रपटाच्या कथेची केवळ एक लाइन ऐकून त्या तिघांनी या चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार करणार असून या चित्रपटाचे चित्रीकरण पुढील वर्षी सुरू होणार असल्याची चर्चा होती. या चित्रपटाचे चित्रीकरण पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच सुरू होईल आणि चित्रपट पुढील ख्रिस्मसमध्ये प्रदर्शित होईल असे म्हटले जात होते. पण आता हेरा फेरी या चित्रपटाच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. या चित्रपटाची पटकथा संपूर्णपणे तयार नसल्याने या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू व्हायला वेळ लागेल असे म्हटले जात आहे.
हेरा फेरी या चित्रपटाचे दोन्ही भाग प्रचंड गाजले असल्याने या चित्रपटाच्या तिसऱ्या भागापासून देखील प्रेक्षकांना खूपच अपेक्षा आहेत. या चित्रपटाची कथा देखील पहिल्या दोन भागांप्रमाणे सशक्त असावी असे या चित्रपटाच्या टीममधील मंडळीचे म्हणणे आहे. कथा पूर्णपणे तयार असल्याशिवाय चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तारखा देणार नाही असे स्पष्ट अक्षय कुमारने सांगितले आहे. हेरा फेरी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यामुळे दर्जेदार कथा असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला पाहिजे असे अक्षयचे मत असल्याने या चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले असल्याची चर्चा आहे.