​अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’ चे पोस्टर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2016 10:06 PM2016-12-02T22:06:33+5:302016-12-02T22:06:33+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने ‘जॉली एलएलबी २’ चे पोस्टर सोशल मीडियाहून रिलीज केले. या पोस्टरमध्ये अक्षय कुमार स्कुटर चालवताना ...

Akshay Kumar's 'Jolly LLB 2' poster displayed | ​अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’ चे पोस्टर प्रदर्शित

​अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’ चे पोस्टर प्रदर्शित

googlenewsNext
ong>बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने ‘जॉली एलएलबी २’ चे पोस्टर सोशल मीडियाहून रिलीज केले. या पोस्टरमध्ये अक्षय कुमार स्कुटर चालवताना दिसत आहे. स्कुटरच्या मागे त्याने स्वत:चीच जाहिरात केली असून आपला संपर्क क्रमांकही दिला असल्याने ही हे पोस्टर मनोरंजक वाटते. यावरून हा चित्रपट मनोरंजक आहे हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

 दिग्दर्शक सुभाष कपूर दिग्दर्शित २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटात अर्शद वारसी व बोमन इरानी यांच्या प्रमुख भूमिका होत्या त्याच चित्रपटाचा हा सिक्वल आहे. ‘जॉली एलएलबी २’मध्ये अक्षय कुमार वकिलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अक्षय कुमार सध्या पाठोपाठ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यामुळेच त्याने ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाचे शूटिंग रेर्काड वेळेत संपविले होते. 

Get set to meet Jolly tonight. The journey of #JollyLLB2 begins...here is the teaser poster!! pic.twitter.com/36sqR7NOgM— Akshay Kumar (@akshaykumar) December 2, 2016 ">http://

}}}}

अक्षय कुमारने शेअर केलेल्या ‘जॉली एलएलबी २’चे पोस्टर मनोरंजल आहे. यात अक्षय कुमार स्कुटर चालविताना दिसत असला तरी त्याचा चेहरा मात्र दिसत नाही. ‘द स्टेट व्हर्सेेस जॉली एलएलबी २’ असे यावर लिहले आहे.  ‘जॉलीला भेटायला तयार रहा. ‘जॉली एलएलबी २’ चा प्रवास सुरू झाला आहे. पाहा पहिले टिझर पोस्टर असे म्हणत अक्षयने ट्विटरवर हे पोस्टर शेअर केले. 

‘जॉली एलएलबी’मध्ये एक अर्शद वारसीने होतकरु वकिलाची भूमिका साकारली होती यात  हिट अ‍ॅण्ड रन केसमधील निर्णयात बदल घडवून आणण्याचा तो प्रयत्न करताना दिसला होता. ‘जॉली एलएलबी २’मध्ये त्याचा लढा सरकारशी असेल असे पोस्टर पाहिल्यावर दिसते. 

Web Title: Akshay Kumar's 'Jolly LLB 2' poster displayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.