अक्षय कुमारच्या 'कंचना' चित्रपटात अमिताभ बच्चन पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 19:20 IST2019-04-24T19:20:00+5:302019-04-24T19:20:00+5:30

तमीळ हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुनी २: कंचना'चा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Akshay Kumar's 'Kanchana' film will be the first 'Amitabh Bachchan' role to play | अक्षय कुमारच्या 'कंचना' चित्रपटात अमिताभ बच्चन पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका

अक्षय कुमारच्या 'कंचना' चित्रपटात अमिताभ बच्चन पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका

तमीळ हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुनी २: कंचना'चा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अक्षयसोबत या चित्रपटात प्रमुख भूमिकेत बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन दिसणार आहेत. 

२०११ साली तमीळ हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुनी २: कंचना' प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अक्षय कुमार राघवच्या भूमिकेत दिसणार आहे.

राघवमध्ये एका ट्रान्सजेंडर महिलेची आत्मा प्रवेश करत असते आणि तिला आपल्या हत्येचा बदल घ्यायचा असतो, यावर आधारीत हा सिनेमा आहे. अक्षयने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. 


डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार 'कंचना'च्या हिंदी रिमेकमध्ये अमिताभ बच्चन आपल्या करियरमध्ये पहिल्यांदा ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहेत. ते या चित्रपटात कंचनाच्या भूमिकेत दिसणार आहे. कंचना ट्रान्सजेंडर महिला असून तिला आपल्या हत्येचा बदला घ्यायचा असतो म्हणून ती राघवच्या शरीरात प्रवेश घेते. तमीळ सिनेमात कंचनाची भूमिका आर शरद कुमार यांनी केली होती.


१९८१ साली प्रदर्शित झालेल्या 'लावारिस' सिनेमात अमिताभ बच्चन महिलेच्या अवतारात दिसले होते. आयकॉनिक साँग 'मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है' या गाण्यात अमिताभ बच्चन महिलेच्या वेशात पहायला मिळाले होते. कंचना चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे शीर्षक लक्ष्मी ठेवले जाईल व कथेत थोडाफार बदल केला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. 
सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटात कियारा आडवाणी अक्षय कुमारच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय व अमिताभ बच्चन यांना वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

 

Web Title: Akshay Kumar's 'Kanchana' film will be the first 'Amitabh Bachchan' role to play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.