'...ते महत्त्वाचं नाही'; पृथ्वीराज चौहान यांच्या जन्मस्थानाविषयी प्रश्न विचारणाऱ्याला अक्षयचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 03:37 PM2022-05-10T15:37:03+5:302022-05-10T15:37:36+5:30
Akshay kumar: पृथ्वीराज चौहान यांच्या जन्मस्थळाविषयीअक्षयनेला एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं अक्षयने दिलेल्या उत्तरांमुळे उपस्थितांची मनं जिंकून घेतली आहेत.
अक्षय कुमार, मानुषी छिल्लर आणि दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या पृथ्वीराज या सिनेमाचा भव्य ट्रेलर लॉन्च केला. या सिनेमात अक्षय सोबत मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) देखील आहे. . या सिनेमात पृथ्वीराज चौहान यांच्या साहसाची कथा दाखवली जाणार आहे. सिनेमाबाबत आधीच फॅन्समध्ये क्रेझ निर्माण झाली आहे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या बहुप्रतिक्षीत व बहुचर्चित ठरत असलेल्या 'पृथ्वीराज' या चित्रपटाचा ट्रेलर (Prithviraj Trailer) अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय महाराजा पृथ्वीराज यांची भूमिका साकारत आहे. तर मानुषी छिल्लर(Manushi Chhillar) , संयोगिता या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार भावुक दिसत असून महाराजा पृथ्वीराज चौहान यांच्याप्रतीचा त्याचा आदर दिसून येत आहे.
'पृथ्वीराज' (Prithviraj) या चित्रपटातून महाराजाच पृथ्वीराज चौहान यांची साहस कथा उलगडली जाणार आहे. त्यामुळे या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात अक्षयला काही प्रश्न विचारण्यात आले. यात पृथ्वीराज चौहान यांच्या जन्मस्थळाविषयी एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं अक्षयने दिलेल्या उत्तरांमुळे उपस्थितांची मनं जिंकून घेतली आहेत.
काय दिलं अक्षयने उत्तर?
'महाराजा पृथ्वीराज चौहान नेमके कुठले होते गुजरात की राजस्थान?'असा प्रश्न अक्षयला विचारण्यात आला. त्यावर, "पृथ्वीराज चौहान भारताचे होते जास्त महत्त्वाचं आहे.ते भारताचे होते मी इतकंच सांगेन. कारण, बाकी कोणतीच गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची नाही. ते देशात कुठेही राहू देत. पण ते भारत देशाचे होते यातच सगळं आलं. आणि, हो ते भारतमातेचे पूत्र होते हे खूप महत्त्वाचं आहे", असं उत्तर अक्षय कुमारने दिलं.
दरम्यान, अक्षयने दिलेल्या उत्तरामुळे उपस्थित सगळ्यांनीच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. या चित्रपटाचं दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी करत आहेत. तर, निर्मिती यशराज प्रोडक्शन अंतर्गत करण्यात येत आहे.