या कारणामुळे नेटिझन्सने केली सलमान खान आणि अक्षय कुमारच्या मुलाची तुलना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 19:26 IST2019-05-27T19:22:34+5:302019-05-27T19:26:27+5:30
ट्विंकल खन्ना आणि तिचा मुलगा आरव यांना नुकतेच विमानतळावर पाहाण्यात आले.

या कारणामुळे नेटिझन्सने केली सलमान खान आणि अक्षय कुमारच्या मुलाची तुलना
नेटिझन्स कधी कोणत्या गोष्टीवर कशाप्रकारे रिअॅक्ट होतील हे सांगणे कठीण आहे. सोशल मीडियावर स्टार किडच्या मुलांना ट्रोल करणे यात काही नवीन नाहीये. सुहाना खान, न्यासा देवगण यांसारख्या अनेक सेलिब्रेटी किडना आजवर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. आता अक्षय कुमारचा मुलगा आरवला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
ट्विंकल खन्ना आणि तिचा मुलगा आरव यांना नुकतेच विमानतळावर पाहाण्यात आले. त्यावेळी ट्विंकल जीन्स आणि टी-शर्ट मध्ये खूपच छान दिसत होती. तिने यावेळी स्टायलिश गॉगल देखील लावला होता. आरवने देखील स्टायलिश टी-शर्ट आणि गॉगल घातला होता. पण असे असून देखील त्याच्या स्टाईलवरून त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आणि चक्क त्याची तुलना बॉलिवूडमधील एका अभिनेत्यासोबत करण्यात आली.
आरवचा विमानतळावरील हा फोटो पाहून त्याच्या कपड्यांपेक्षा देखील त्याच्या हेअर स्टायलची जास्त चर्चा रंगली. त्याची ही हेअर स्टाईल पाहून त्याची तुलना सलमान खानसोबत करण्यात आली. सलमान खानचा तेरे नाम हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच... या चित्रपटात सलमानची हेअरस्टाईल ही हटके होती. आरव देखील काहीसा यासारख्याच हेअर स्टाईलमध्ये दिसला. त्याच्या या फोटोवर कोणी त्याला तेरे नाम हेअर स्टाईल अशी कमेंट दिली तर काही नेटिझन्सनी त्याला तेरे नाम फॅन म्हटले.
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाचा मुलगा आरव नेहमीच प्रसारमाध्यमांपासून दूर राहाणेच पसंत करतो. पण सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये कितीही व्यग्र असला तरी तो त्याच्या कुटुंबियांना नेहमीच वेळ देतो. अक्षय हा बॉलिवूडमधील इतर अभिनेत्यांपेक्षा खूपच वेगळा आहे. बॉलिवूड पार्टींमध्ये अथवा पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावण्यापेक्षा तो त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतो. त्याला आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत. तो त्याची पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलांसोबत नेहमीच फिरायला जातो. तो त्याच्या कुटुंबियांसोबतचे फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर देखील पोस्ट करत असतो.