अक्षयकुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ चित्रपटाची स्क्रिप्ट चोरीची असल्याचा ‘यांनी’ केला आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2017 02:41 PM2017-07-01T14:41:45+5:302017-07-01T20:13:46+5:30

अभिनेता अक्षयकुमार याच्या आगामी ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचे ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आले. ट्रेलर बघून प्रेक्षकांनी चित्रपटाचे अन् अक्षयचे तोंडभरून कौतुकही केले. मात्र आता या चित्रपटाबाबत एक नवा वाद निर्माण होणार असल्याचे संकेत मिळाल्याने आगामी काळात काही अप्रिय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Akshay Kumar's 'Toilet: Ek Prem Katha' script is a mystery of the script being stolen! | अक्षयकुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ चित्रपटाची स्क्रिप्ट चोरीची असल्याचा ‘यांनी’ केला आरोप!

अक्षयकुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ चित्रपटाची स्क्रिप्ट चोरीची असल्याचा ‘यांनी’ केला आरोप!

googlenewsNext
िनेता अक्षयकुमार याच्या आगामी ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचे ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आले. ट्रेलर बघून प्रेक्षकांनी चित्रपटाचे अन् अक्षयचे तोंडभरून कौतुकही केले. मात्र आता या चित्रपटाबाबत एक नवा वाद निर्माण होणार असल्याचे संकेत मिळाल्याने आगामी काळात काही अप्रिय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रवीण व्यास यांनी चित्रपटातील काही सीन्स चोरीचे असल्याचा आरोप लावला आहे. प्रवीण व्यास यांनी दावा केला की, चित्रपटातील काही सीन्स त्यांच्या चित्रपटातील सीन्सशी साम्य साधणारे असल्याने ते चोरले आहेत. 

मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत प्रवीण व्यास यांनी म्हटले की, अक्षयच्या या चित्रपटाची स्क्रिप्ट त्यांच्या ‘मनिनि’ या चित्रपटाची कॉपी आहे. गेल्यावर्षी व्यास यांचा ‘मनिनि’ हा चित्रपट गोवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडियामध्ये दाखविण्यात आला होता. हा चित्रपट ‘स्वच्छ भारत अभियान’वर आधारित असून, फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यामुळे ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’च्या निर्मात्यांना लवकरच याबाबतची कायदेशीर नोटीस पाठविणार असल्याचेही व्यास यांनी स्पष्ट केले. या नोटिसीच्या माध्यमातून अक्षयच्या चित्रपटावर स्टे लावण्याची व्यास मागणी करणार आहेत. 



प्रवीण व्यास या चित्रपटाची कथा ‘मनिनि’ची आहे. जी तिच्या सासरवाडीत शौचालय नसल्यावरून विरोध करते. तिच्या लग्नाच्या दुसºयाच दिवशी ती आपल्या परिवाराकडे परत येते. अशीच काहीशी कथा अक्षयकुमारच्या आगामी ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाची आहे. प्रवीण व्यासनी तर हादेखील दावा केला की, केवळ स्क्रिप्टच नव्हे तर चित्रपटातील डायलॉग्समध्ये सारखेपणा आहे. मात्र प्रवीणचे हे सर्व आरोप ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या निर्मात्याने फेटाळले आहेत. 

दरम्यान, अक्षयच्या या चित्रपटाचे ट्रेलर बघून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही त्याचे कौतुक केले होते. शिवाय त्यांनी या चित्रपटासाठी अक्षयला शुभेच्छाही दिल्या होत्या. आता या सर्व प्रकरणावर अक्षयकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे बघणे मजेशीर ठरेल. वास्तविक गेल्या काही काळापासून बॉलिवूडमधील बºयाचशा चित्रपटांवर चोरीचा आरोप लावला जात आहे. बºयाचदा हे आरोप केवळ पब्लिसिटीसाठी केले जात असल्याचेही बोलले जाते. मात्र खरंच अशा पब्लिसिटीमुळे चित्रपटाला फायदा होतो काय? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे. 

Web Title: Akshay Kumar's 'Toilet: Ek Prem Katha' script is a mystery of the script being stolen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.