​अक्षय-राधिका करणार रोमांस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2016 08:24 PM2016-11-01T20:24:20+5:302016-11-02T09:52:49+5:30

अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच अक्षय राधिका आपटेसोबत रोमांस करताना दिसणार आहे. दाक्षिणात्य चित्रपटात आपला वेगळा ठसा ...

Akshay-Radhika will make romance | ​अक्षय-राधिका करणार रोमांस

​अक्षय-राधिका करणार रोमांस

googlenewsNext
्षय कुमारच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच अक्षय राधिका आपटेसोबत रोमांस करताना दिसणार आहे.

दाक्षिणात्य चित्रपटात आपला वेगळा ठसा उमटविल्यावर बॉलिवूडमध्ये नाम कलांतासोबत काम करणाऱ्या आर. बल्की यांच्या आगामी चित्रपटात अक्षय कुमार व राधिका आपटे एकत्र दिसणार आहेत.  

या चित्रपटात अक्षयच्या अपोझिट दोन नायिका असून यापैकी राधिकाची निवड पक्की मानली जात आहे तर दुसऱ्या अभिनेत्रीचे नाव अद्याप फायनल व्हायचे आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर. बल्की या चित्रपटाच्या कथेवर काम करीत आहेत. तर अक्षय सध्या आपल्या कुटुंबासोबत केप टाऊनला दिवाळीच्या सुट्या एन्जॉय करतो आहे. केप टाऊनहून परत आल्यावर अक्षय व बल्की या चित्रपटावर काम सुरू करणार आहे. राधिकाची निवड पक्की होण्यामागे तिने साकारलेल्या व्हर्साटाईल भूमिका हे कारण मानले जात आहे. राधिकाने ‘मांझी- द माऊंटेन मॅन’, ‘कबाली’ व ‘पाश्चर्ड’ या चित्रपटात साकारलेल्या भूमिकांचे कौतुक होत आहे.

                                     

अक्षय कुमारने नुकतीच सुभाष कपूर दिग्दर्शित करीत असलेल्या ‘जॉली एलएलबी 2’ची शूटिंग पूर्ण केली आहे. या वर्षी अक्षयचे सर्व चित्रपट हिट ठरल्याने तो बॉलिवूडमध्ये सध्या भरवश्याचा स्टार झाला आहे. दुसरीकडे आर. बल्की यांना ‘की अ‍ॅण्ड का’ या चित्रपटाच्या अपयशाला समोरे जावे लागले आहे. यामुळे त्यांच्यासाठी हा चित्रपट महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळेच बल्की आपल्या चित्रपटासाठी अक्षयच्या तारखा जुळविण्याच्या प्रयत्न करीत आहे.

अक्षय आगामी ‘क्रॅक’,‘नाम शबाना’ व ‘टॉयलेट -एक प्रेम कथा’च्या शूटिंगपूर्वी चित्रपटाच्या सुुरुवातीच्या कामांना फायनल करू इच्छित असल्याचेही सांगण्यात येत आहे. आर, बल्कीसाठी हा चित्रपट महत्त्वाचा मानला जात आहे. 

Web Title: Akshay-Radhika will make romance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.