Akshaye Khanna: कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक असूनही अक्षय खन्ना आजही आहे सिंगल, या अभिनेत्रीच्या प्रेमात होता वेडा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 06:22 PM2023-03-28T18:22:20+5:302023-03-28T18:22:50+5:30

Akshaye Khanna: बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाने वयाची ४५शी ओलांडल्यानंतरही लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Akshaye Khanna: Akshaye Khanna is still single despite owning crores of wealth, was madly in love with this actress... | Akshaye Khanna: कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक असूनही अक्षय खन्ना आजही आहे सिंगल, या अभिनेत्रीच्या प्रेमात होता वेडा...

Akshaye Khanna: कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक असूनही अक्षय खन्ना आजही आहे सिंगल, या अभिनेत्रीच्या प्रेमात होता वेडा...

googlenewsNext

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) आज म्हणजेच २८ मार्च रोजी वाढदिवस साजरा करत आहे. या अभिनेत्याची गणना बॉलिवूडच्या स्टार किड्समध्ये केली जाते. अक्षय हा दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा धाकटा मुलगा आहे. अभिनेत्याने मुंबईतील बॉम्बे इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले, त्यानंतर त्याने ११ वी आणि १२ वी इयत्तेसाठी उटी येथील लॉरेन्स स्कूलमध्ये जाणे पसंत केले. अक्षयने 'रेस', 'दिल चाहता है', 'हंगामा', 'ताल' आणि 'हलचल', 'सेक्शन ३७५' सारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता नुकताच 'दृश्यम २' मध्ये दिसला होता. अक्षय खन्नाने त्याच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर अनेक फिल्मफेअर आणि आयफा पुरस्कार जिंकले आहेत. 

इंडस्ट्रीत यशस्वी कारकीर्द असूनही अक्षय खन्नाने अद्याप लग्न केलेले नाही. या अभिनेत्याचे नाव अनेक बॉलीवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले असले तरी त्यांचे कोणाशीही नाते फार काळ टिकू शकले नाही. बॉलिवूडच्या भाईजानप्रमाणे अक्षय अजूनही सिंगल आहे. त्याचे अजून लग्न झालेले नाही. अक्षयचे कनेक्शन बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध कुटुंबाशी म्हणजेच कपूर कुटुंबाशी जोडलेले दिसले. रणधीर कपूरने आपली मुलगी करिश्मा कपूरच्या नात्यासाठी अक्षय खन्नाच्या कुटुंबाशी संपर्क साधला होता, मात्र नंतर करिश्माची आई बबिता यांनी या नात्याला नकार दिला. एका मीडिया रिपोर्टनुसार, काही काळापूर्वी अक्षय म्हणाला होता की, तो लग्न मटेरियल आहे असे त्याला वाटत नाही. यासोबतच अक्षयने आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवल्याचेही सांगितले होते.


अक्षय खन्नाने आपल्या अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. अक्षयचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत. त्याच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे २० दशलक्ष म्हणजेच १४८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे मुंबईत एक आलिशान फ्लॅट आहे, जिथे अभिनेता राहतो. इतकंच नाही तर अक्षयच्या नावावर पुणे आणि दिल्लीसारख्या शहरातही एक प्रॉपर्टी आहे. त्याच वेळी, त्याच्या कार कलेक्शनबद्दल सांगायचे तर, त्याच्याकडे ऑडी, बीएमडब्ल्यू आणि होंडा सीआर-व्हीसह अनेक गाड्या आहेत.

Web Title: Akshaye Khanna: Akshaye Khanna is still single despite owning crores of wealth, was madly in love with this actress...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.