अब आयेगा मजा! ‘दृश्यम 2’मध्ये अजय-तब्बूसोबत झाली ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 12:48 PM2022-05-01T12:48:47+5:302022-05-01T12:50:02+5:30
Drishyam 2 : 2015 साली रिलीज झालेला अजय देवगण (Ajay Devgn) , तब्बू (Tabbu), श्रिया सरन (Shriya Saran) यांचा ‘दृश्यम’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. आता तब्बल 7 वषार्नंतर या चित्रपटाचा सीक्वल तुमच्या आमच्या भेटीस येतोय.
2015 साली रिलीज झालेला अजय देवगण (Ajay Devgn) , तब्बू (Tabbu), श्रिया सरन (Shriya Saran) यांचा ‘दृश्यम’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. आता तब्बल 7 वषार्नंतर या चित्रपटाचा सीक्वल तुमच्या आमच्या भेटीस येतोय. होय, ‘दृश्यम 2’चं (Drishyam 2 ) शूटींग कधीच सुरू झालं आहे़ या चित्रपटात अजय देवगण व तब्बू मुख्य भूमिकेत आहेत. पण त्याशिवाय आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री सिनेमात झाली आहे. खुद्द तब्बूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. हा अभिनेता दुसरा कुणी नसून अक्षय खन्ना आहे.
तब्बूने इन्स्टाग्रामवर अक्षयसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ‘दृश्यम 2’मध्ये अक्षयच्या एन्ट्रीने तब्बू चांगलीच खूश आहे.
चौथी नापास असलेला विजय आणि त्याच्या कुटुंबाची कथा चाहत्यांना प्रचंड भावली होती. एका हत्या प्रकरणामुळे विजयचं कुटुंब अडचणीत येतं. विजय अतिशय शिताफीनं त्याच्या कुटुंबाला या प्रकरणातून वाचवतो. शेवटपर्यंत खिळवून ठेवणा-या या चित्रपटानं चाहत्यांना वेड लावलं होतं. याचा सीक्वल येणार प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चाहते या थ्रिलर ड्रामाच्या सीक्वलची आतुरतेने वाट पाहत असताना, अजय देवगण आणि श्रिया सरन यांनी ‘दृश्यम 2’च्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
काही दिवसांपूर्वी अजयने ‘दृश्यम 2’च्या सेटवरील एक स्टिल फोटो शेअर केला आहे. यात तो श्रिया सरन आणि दिग्दर्शक अभिषेक पाठक यांच्यासोबत एका दृश्यावर चर्चा करताना दिसला होता. ‘विजय पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबाचं रक्षण करू शकेल का?’, असं कॅप्शन देत अजयने हा फोटो शेअर केला होता. ‘दृश्यम 2’मध्ये अजय विजयची भूमिका साकारणार असून श्रिया त्याची पत्नी नंदिनीची भूमिका साकारणार आहे.
‘दृश्यम’ हा याच नावाच्या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात मोहनलालनं भूमिका साकारली होती.
गतवर्षी मूळ मल्याळी भाषेतील ‘दृश्यम 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला मिळणारी दाद पाहता हिंदीतही ‘दृश्यम 2’ची घोषणा झाली होती. पहिला भाग ज्या ठिकाणी संपतो, त्याच्या सहा वर्षांनंतरची कथा या दुसºया भागात दाखवण्यात येणार आहे.