अक्षय खन्ना वयाच्या ४९ व्या वर्षीही का आहे अविवाहित? म्हणाला, "मला नाही वाटत आयुष्यात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 10:11 IST2025-02-05T10:10:30+5:302025-02-05T10:11:01+5:30
मूल दत्तक घेण्याबाबतीत अक्षय म्हणाला...

अक्षय खन्ना वयाच्या ४९ व्या वर्षीही का आहे अविवाहित? म्हणाला, "मला नाही वाटत आयुष्यात..."
बॉलिवूडमध्ये एकेकाळी आपल्या अभिनयाने आणि लूक्सने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता होता अक्षय खन्ना (Akshaye Khanna). काही काळाने तो मोजक्याच सिनेमांमध्ये दिसू लागला. 'ताल', 'रेस', 'हलचल','हमराज' सारख्या सिनेमांमधून त्याने अभिनयाची चुणूक दाखवली. हँडसम अभिनेते विनोद खन्नांचा मुलगा म्हणून तो इंडस्ट्रीत आला आणि स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला. मात्र अक्षय खन्नाने आजपर्यंत लग्न का केलं नाही असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याचंच उत्तर त्याने एका मुलाखतीत दिलं होतं.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या जुन्या मुलाखतीत अक्षय खन्ना म्हणाला होता की, "मी स्वत:ला विवाहित असलेलं बघू शकत नाही. ते म्हणतात ना मी मॅरेज मटेरियल नाही. मी त्यासाठी बनलेलोच नाही. लग्न ही एक कमिटमेंट आहे पण यामुळे जीवनशैलीत मोठा बदलही होतो. लग्नानंतर अनेक बदल होतात. मला माझ्या आयुष्यावर पूर्ण नियंत्रण हवं असतं. पण जेव्हा तुम्ही एका पार्टनरसोबत आयुष्य घालवता तेव्हा तुमचा तुमच्या आयुष्यावर पूर्ण कंट्रोल नसतो. बऱ्याच प्रमाणात नियंत्रण सोडावं लागतं. तुम्ही एकमेकांसोबत आयुष्य शेअर करता."
मूल दत्तक घेण्याबाबतीत अक्षय म्हणाला, "मी त्यासाठी अजून तयार नाही. मला माझं आयुष्य कोणाबरोबरच शेअर करायचं नाही. मग ते लग्न करुन असो किंवा मूल जन्माला घालून असो. त्यामुळेही तुमच्या जीवनात बदल होतात. तुमचं महत्व कमी होऊन मुलांना जास्त महत्व मिळतं. अशा प्रकारचे बदल होतात जे मला करायचेच नाहीत. मला हार मानायची नाही. मला नाही वाटत मी भविष्यातही यासाठी तयार असेन."
अक्षय खन्ना आगामी 'छावा' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये त्याने औरंगजेबची भूमिका साकारली आहे. त्याचा लूक पाहून आधी कोणीही त्याला ओळखलंच नव्हतं. अक्षयची ही भूमिका पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.