'हा अक्षय खन्नाच आहे ना?', औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने केलेलं भन्नाट फोटोशूट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:45 IST2025-02-25T12:45:25+5:302025-02-25T12:45:47+5:30

'छावा' सिनेमातील औरंगच्या भूमिकेसाठी अक्षय खन्नाने केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात झालंय (chhaava, akshaye khanna)

Akshaye Khanna photoshoot for the role of Aurangzeb in chhaava movie goes viral | 'हा अक्षय खन्नाच आहे ना?', औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने केलेलं भन्नाट फोटोशूट व्हायरल

'हा अक्षय खन्नाच आहे ना?', औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने केलेलं भन्नाट फोटोशूट व्हायरल

'छावा' सिनेमाची (chhaava movie) सध्या चांगलीच चर्चा आहे. लक्ष्मण उतेकरांनी (laxman utekar) सिनेमासाठी केलेला रिसर्च आणि मेहनत फळाला आली. रिलीज झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच 'छावा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीय. 'छावा' सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. विकी कौशलच्या तोडीस तोड 'छावा' सिनेमात अक्षय खन्ना दिसलाय. औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नाने (akshaye khanna) चांगलीच छाप पाडलीय. अक्षय खन्नाने औरंगच्या भूमिकेसाठी केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

अक्षय खन्नाचं फोटोशूट
सोशल मीडियावर छावाचं कॅरेक्टर डिझाईन, मेकअप आणि हेअर डिझाईन करणारे आर्टिस्ट प्रीतिशील सिंग यांनी अक्षय खन्नाचं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलंय. अक्षय खन्नाचे औरंगच्या भूमिकेतले दोन फोटो पोस्ट करण्यात आलेत. अक्षय खन्नाचं औरंगजेबाच्या भूमिकेतील जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन हे थक्क करणारं आहे. अक्षय खन्नाची धारदार नजर, धीरगंभीर लूक काळजात धडकी भरवणारा आहे. "हा अक्षय खन्नाच आहे का?" असा सर्वांना प्रश्न पडलाय, इतका जबरदस्त लूक अक्षय खन्नाचा आहे.







अक्षय खन्नाच्या फोटोशूटवर चाहत्यांच्या कमेंट्स

"या लूकला पाहून स्वतः अक्षय खन्नाही घाबरला असेल", "अक्षय सर खूप ग्रेट कलाकार आहे, मेकअप खूप भारी केलाय", "मेकअप आर्टिस्टचं कौतुक करावं तितकं कमी", "हा अक्षय खन्ना वाटतच नाही यार, खूप भारी लूक केलाय मेकअप आर्टिस्टने", अशा कमेंट्स करत चाहत्यांनी अक्षय खन्नाच्या लूकला पसंती दिली आहे. अक्षय खन्नाने 'छावा' सिनेमात साकारलेली औरंगजेबाची भूमिका लक्षात राहणारी आहे. अक्षय किती ताकदीचा अभिनेता आहे हे त्याने पुन्हा पुन्हा दाखवून दिलंय

 

Web Title: Akshaye Khanna photoshoot for the role of Aurangzeb in chhaava movie goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.