इतकी वर्ष काम करुनही 'स्टार' का झाला नाहीस? अक्षय खन्नाच्या उत्तराने सर्वांची बोलती बंद, म्हणाला-

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:49 IST2025-02-24T15:46:55+5:302025-02-24T15:49:18+5:30

अक्षय खन्नाला आजवर त्याच्या अभिनयाच्या जोरावर स्टार का होता आलं नाही, याचा खुलासा त्याने केलाय. काय म्हणाला अक्षय? जाणून घ्या (akshaye khanna)

akshaye khanna talk about he is not star since working along time in industry | इतकी वर्ष काम करुनही 'स्टार' का झाला नाहीस? अक्षय खन्नाच्या उत्तराने सर्वांची बोलती बंद, म्हणाला-

इतकी वर्ष काम करुनही 'स्टार' का झाला नाहीस? अक्षय खन्नाच्या उत्तराने सर्वांची बोलती बंद, म्हणाला-

'छावा' सिनेमाची (chhaava movie) सर्वांना चांगलीच उत्सुकता आहे. या सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारली अक्षय खन्नाने. अक्षयने औरंगजेबाच्या भूमिकेत जो अभिनय केलाय त्याचं खूप कौतुक होतंय. 'छावा' सिनेमाच्या निमित्ताने अक्षय खन्नाला (akshaye khanna) अमाप प्रसिद्धी मिळाली. इतकी वर्ष काम करुनही अक्षय खन्नाला का स्टार होता आलं नाही, असा प्रश्न अक्षयला एका मुलाखतीत विचारला. त्यावेळी अक्षयने दिलेलं उत्तर ऐकून सर्वांचीच बोलती बंद केली.

स्टार होता का आलं नाही? अक्षय खन्ना म्हणाला...

अक्षय खन्नाला एका मुलाखतीत, इतकी वर्ष अभिनय क्षेत्रात सक्रीय होऊनही स्टार का झाला नाहीस,असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर अक्षयने उत्तर दिलं की, "मी कधीकधी हा विचार करतो की, समझा मी एखादा बिझनेसमन आहे. आणि माझा ५०० कोटींचा व्यवसाय असेल. पण जोवर मी रतन टाटा , धीरुभाई अंबानी किंवा अझीम प्रेमजी नाही बनणार तर मी यशस्वी नाही का? जोवर मी शाहरुख खान बनत नाही तोवर मी यश बघितलं नाही? स्टार बनलोच नाही? आपल्या १२० कोटींच्या लोकसंख्येत १५-२० लोकांना सिनेमात काम करण्याची संधी मिळती. अजून आपल्याला काय पाहिजे?"

अक्षय खन्नाचा औरंगजेब गाजतोय

अक्षय खन्नाने 'छावा' सिनेमा साकारलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेचं सध्या चांगलंच कौतुक होतंय. 'खलनायक रंगवावा तर असा', 'तो एकदाच येतो आणि छाप पाडून जातो', अशा शब्दात लोकांनी अक्षयच्या अभिनयाचं कौतुक केलंय. अक्षय खन्नाला आपण 'दिल चाहता है', 'हंगामा', 'हलचल', 'तीस मार खान', 'दृश्यम २', 'इत्तेफाक', 'आर्टिकल ३५६' अशा सिनेमांमध्ये अक्षय खन्नाने काम केलंय. अक्षय खन्नाने मोठा ब्रेक घेऊन 'छावा' निमित्ताने पुन्हा रुपेरी पडद्यावर कमबॅक केलंय.

Web Title: akshaye khanna talk about he is not star since working along time in industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.