एकेकाळी या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात वेडापीसा झालेला अक्षय खन्ना, पण होऊ शकलं नाही लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 18:01 IST2025-03-28T18:00:39+5:302025-03-28T18:01:21+5:30
Akshaye Khanna : सध्या अभिनेता अक्षय खन्ना 'छावा' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

एकेकाळी या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात वेडापीसा झालेला अक्षय खन्ना, पण होऊ शकलं नाही लग्न
सध्या अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) 'छावा' सिनेमा(Chhaava Movie)मुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटात त्याने साकारलेला औरंगजेब प्रेक्षकांना खूप भावला. नव्वदच्या दशकात अक्षय खन्नाने अनेक हिट सिनेमात काम केले. मात्र एक काळ असा होता जेव्हा अभिनेता सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरच्या प्रेमात पडला होता. असे म्हटले जाते की, दोघेही लग्न करणार होते. पण ते शक्य होऊ शकले नाही आणि अभिनेता अद्याप सिंगलच राहिला.
अक्षय खन्ना हा दिवंगत सुपरस्टार विनोद खन्ना यांचा मुलगा असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. १९९७ मध्ये रिलीज झालेल्या 'हिमालय पुत्र' या चित्रपटातून या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. सिनेजगतात काम करत असताना अक्षय अभिनेत्री करिश्मा कपूरच्या प्रेमात पडला होता.
अभिनेत्याने केलं नाही लग्न, म्हणाला...
करिश्मा कपूरलाही अक्षय खूप आवडायचा. दोघांनी लग्न करावे अशी अभिनेत्रीच्या वडिलांची इच्छा असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळेच त्यांनी अक्षयच्या घरी लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र हे नाते तुटले. त्यामुळे अक्षय खन्ना खूप दुःखात होता. काही वर्षांनी करिश्माने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले आणि वेगळीदेखील झाली. मात्र अक्षय खन्नाने लग्नच केले नाही. तो सिंगल लाइफ जगतो आहे. अक्षय खन्ना एका मुलाखतीत त्याच्या बॅचलर असण्यामागचे कारण सांगताना म्हणाला होता, 'मी जास्त काळ कोणाशीही रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही आणि मला मुलंही आवडत नाहीत. म्हणूनच मला कधीच लग्न करायचं नाही.