1 महिन्यात अक्षयच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केला कोटींचा बिझनेस.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 10:51 AM2017-09-11T10:51:56+5:302017-09-11T16:23:05+5:30

अभिनेता अक्षय कुमारचा टॉयलेट : एक प्रेम कथा चित्रपट रिलीज होऊन काही महिने होऊन गेले आहेत. मात्र रिलीज झाल्यानंतर ...

Akshay's debut in the box office at the box office | 1 महिन्यात अक्षयच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केला कोटींचा बिझनेस.. वाचा सविस्तर

1 महिन्यात अक्षयच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केला कोटींचा बिझनेस.. वाचा सविस्तर

googlenewsNext
िनेता अक्षय कुमारचा टॉयलेट : एक प्रेम कथा चित्रपट रिलीज होऊन काही महिने होऊन गेले आहेत. मात्र रिलीज झाल्यानंतर काही महिन्यानंतर ही हा चित्रपट अजून ही बॉक्स ऑफिसवर गल्ला जमावतो आहे. याचित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड तयार केला आहे. कारण हा चित्रपट अक्षयच्या करिअरमधला सर्वाधिक चित्रपट ठरला आहे. टॉयलेट: एक प्रेमकथा चित्रपटाने देशभरात आतपर्यंत 133.60 कोटींचा बिझनेस केला आहे. या आकड्यांसोबतच अक्षयने त्याचे 5 वर्षातला रेकॉर्ड ब्रेक केला आहे. याआधी अक्षयचा सर्वाधिक गल्ला जमावणारा चित्रपट रावडी राठोड होता ज्याने 131 कोटींचा बिझनेस केला होता.  ऐवढेच नाही तर 133 कोटींचा बिझनेस करत टॉयलेट : एक प्रेमकथा यावर्षातील सगळ्यात जास्त कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. शाहरुख खानच्या रईसने 139 कोटींचा बिझनेस केला होता.  बाहुबली 2 डब चित्रपट असल्याने या स्पर्धेत तो येत नाही. 

ALSO READ : अक्षयकुमारची लाडकी लेक नितारा बनली दिग्दर्शक; पहा तिने शूट केलेला व्हिडीओ!

अक्षय कुमारचा चित्रपटात आजही बॉक्स ऑफिसवर सतत कमाई करताना दिसतो आहे. हा चित्रपट 20 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. चित्रपटाच्या बजेटच्या तुलनेत चित्रपटांने पाच पट कमाई केली आहे. सध्या तो गोल्डच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गोल्डमध्ये तो बलवीर सिंग यांची भूमिका साकारणार आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर मिळालेल्या पहिल्या ऑल्पिमिंक गोल्ड मेडलवर आधारित आहे. भारताना 1948 साली हॉकीमध्ये गोल्ड जिंकले होते. अक्षय कुमारच्या 50 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत गोल्डचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले. यानंतर अक्षय पॅडमॅनमध्ये सुद्धा दिसणार आहे. 

Web Title: Akshay's debut in the box office at the box office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.