अली फजल आणि रिचा चड्ढा राहतायेत भाड्याच्या घरात,अदा करतात प्रति महिना लाखो रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 03:48 PM2020-10-17T15:48:22+5:302020-10-17T15:50:29+5:30
74 व्या वेनिस फिल्म फेस्टिवलदरम्यान या दोघांनी आपले नाते जगजाहिर केले होते. दोघांनी एकत्र रेड कार्पेटवर उतरत लोकांना सरप्राईज दिले होते. तेव्हापासून आजपर्यंत हे कपल अगदी खुल्लम खुल्ला फिरताना दिसायचे.
सिनेमांसोबतच मॉडेलिंग, ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आणि जाहिरातींच्या माध्यमातून कलाकार मंडळी कोट्यवधी रुपये कमावतात. मात्र तरीही मुंबईत हक्काचे घर मिळवणे त्यांच्यासाठी मोठा टास्कच असतो. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले कपल रिचा चड्ढा आणि अली फजल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
74 व्या वेनिस फिल्म फेस्टिवलदरम्यान या दोघांनी आपले नाते जगजाहिर केले होते. दोघांनी एकत्र रेड कार्पेटवर उतरत लोकांना सरप्राईज दिले होते. तेव्हापासून आजपर्यंत हे कपल अगदी खुल्लम खुल्ला फिरताना दिसायचे.
यावेळी ते त्यांच्या लग्नामुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.अली फजलने नुकतेच जुहूमध्ये एक बंगला भाड्याने घेतला आहे. त्यामुळे रिचा चड्ढाला हक्काच्या घरात नाही तर भाड्याने घेतलेल्या घरातच तिचा संसार सुरू करावा लागणार आहे. याच घरात दोघांना किमान तीन वर्ष राहावे लागणार आहे. या बंगल्याचे महिन्याचे भाडे लाखांमध्ये आहे. पहिल्या वर्षासाठी ३ लाख रुपये, दुसऱ्या वर्षी बंगल्याचं भाडं ३.१५ लाख रुप तर तिसऱ्या वर्षी ३.३० लाख रुपये इतके भाडं त्यांना दर महिन्याला द्यावे लागणार आहे. नुकतेच हे कपल त्यांच्या नवीन घरी राहायला आले आहेत.
सध्या दोघांच्या लग्नाकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे नेहमीच त्यांना त्यांच्या लग्नाविषयी विचारले जाते. मध्यंतरी दिलेल्या एका मुलाखतीत रिचाला लग्नाच्या प्लॅनिंगबद्दलही विचारले गेले. पण लग्नाचे प्लॅनिंग सांगण्या ऐवजी आम्ही किती बिझी आहोत, हेच सांगितले.
सध्या आम्ही प्रचंड बिझी आहोत. सध्या अलीला स्वत:ला महिन्यातील पाच दिवस कसेबसे मिळतात. आम्ही कमिटमेंटला घाबरतो असे नाही. पण खरोखर आम्ही खूप बिझी आहोत. इतके की, आम्हाला एकमेकांना भेटायलाही वेळ नाही. अनेकदा आम्ही महिन्यातून दोनदा भेटते. कधी कधी तर अंधेरी ते वांद्रे हे अंतरही लॉन्ग डिस्टंट असल्यासारखे वाटते.
अली पहाटे पहाटे शहरात येतो आणि माझी मॉर्निंग शिफ्ट असते. त्यामुळे आम्ही फक्त व्हिडीओ कॉलवरून बोलतो. अशा परिस्थिती आम्ही लग्न कसे करू शकतो?' असे तिने सांगितले होते. मी जिथे असते तिथे येऊन तो मला सरप्राईज देतो. आम्ही एकमेकांसोबत असतो तेव्हा कुकिंग करतो, एकत्र सिनेमे पाहतो, एकत्र वर्कआऊट करतो.