अली फजल-किर्ती कुलहारी झाले सर्वाधिक लोकप्रिय स्टार्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 02:22 PM2019-03-06T14:22:34+5:302019-03-06T14:23:23+5:30

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, गेल्या आठवड्यात 'मिर्झापूर'चा अभिनेता अली फजल आणि 'फोर मोर शॉट्स प्लीज' फेम अभिनेत्री किर्ती कुलहारी वेब सीरिजच्या दुनियेतल्या कलाकारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

Ali Fazal-Kirti became the most popular stars | अली फजल-किर्ती कुलहारी झाले सर्वाधिक लोकप्रिय स्टार्स

अली फजल-किर्ती कुलहारी झाले सर्वाधिक लोकप्रिय स्टार्स

googlenewsNext

 

टेलिव्हिजन आणि रूपेरी पडद्यानंतर सध्या वेब सीरिजचे जग सर्वाधिक लोकप्रिय झालेले आहे. त्यामुळेच तर वेब सीरिजमधल्या कलाकारांची फॅन फॉलोविंगही खूप जास्त वाढत आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, गेल्या आठवड्यात 'मिर्झापूर'चा अभिनेता अली फजल आणि 'फोर मोर शॉट्स प्लीज' फेम अभिनेत्री किर्ती कुलहारी वेब सीरिजच्या दुनियेतल्या कलाकारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

वेब सीरिजच्या लोकप्रिय अभिनेत्रींच्या श्रेणीमध्ये किर्तीने अॅमेझॉन प्राइमच्या 'फोर मोर शॉट्स प्लीज’ या मालिकेत दिलेल्या आपल्या बोल्ड परफॉर्मन्समुळे पहिले स्थान पटकावले आहे. इतके दिवस वेब सीरिज स्टार्सच्या लोकप्रियतेत प्रथम स्थानी असलेल्या राधिका आपटेला किर्तीने 94 गुणांसह नंबर स्थानी येऊन मागे टाकले. नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स आणि घोल मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री राधिका आपटे सध्या लोकप्रियतेत 46 गुणांसह दूसऱ्या स्थानावर आहे. ‘बीएफएफ विथ वोग’ सीजन 2 (वूट) ने नेहा धूपियाला तिसऱ्या स्थानावर नेऊन ठेवले. तर 'इट्स नॉट दॅट सिंपल’ (वूट) आणि रसभरी ह्या वेबमालिकांमूळे स्वरा भास्कर चौथ्या पदावर पोहोचली. 'फोर मोर शॉट्स प्लीज’ची अभिनेत्री लीजा रे पाचव्या स्थानावर आहे.


लोकप्रिय अभिनेत्यांच्या श्रेणीमध्ये अॅमेझॉनच्या मिर्झापुरमध्ये चांगला परफॉर्मन्स देणारा अभिनेता अली फ़जल लोकप्रियतेत प्रथम स्थानी आहे. 79 गुणांसह पहिल्या क्रमांकावर पोहोचलेल्या अलीने ऑल्ट बालाजीच्या ‘कहने को हमसफर हैं’ वेबसीरिजचा अभिनेता रोनित रॉयला लोकप्रियतेत मागे टाकले आहे. रोनित 48 गुणांसह दूसऱ्या स्थानावर आहे. सेक्रेड गेम्सचे दोन्ही लोकप्रिय अभिनेते सैफ अली खान और नवाजुद्दीन सिद्दीकी या यादीत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. तर मिर्झापुरमुळे अभिनेता पंकज त्रिपाठीच्या लोकप्रियतेत वाढ होऊन ते पाचव्या स्थानावर आहेत.
अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाद्वारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये किर्ती आणि अलीची लोकप्रियता डिजिटल न्यूज, न्यूजपेपर आणि वायरल न्यूजमध्ये दिसून आली होती.  


स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल याविषयी म्हणाल्या की, "वेब सीरीज़च्या अभिनेत्यांची वाढती लोकप्रियता जेव्हा आम्ही बारकाईने पाहू लागलो. तेव्हा आमच्या असे लक्षात आले की, आज बॉलिवूड स्टार्सप्रमाणेच ह्या वेबमालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांची लोकप्रियता आहे. सोशल प्लॅटफॉर्म, वायरल न्यूज, डिजिटल न्यूज आणि वर्तमानपत्रांमध्ये त्यांचा वाढता प्रेजेंस ते स्टार्स झाल्याचाच पुरावा आहे. भलेही मेनस्ट्रीम सिनेमामध्ये ह्यातले काही कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसून येत नसले तरीही वेबसीरिजच्या जगातले ते तारे-तारका आहेत.”

 
 

Web Title: Ali Fazal-Kirti became the most popular stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.