डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देण्यास अली फजल सज्ज!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2017 11:44 AM2017-02-23T11:44:58+5:302017-02-23T17:14:58+5:30
बॉलीवूड अभिनेता अली फजल आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजू लागला आहे. ‘फास्ट अँड फ्युरिअस ७’ चित्रपटात काम केल्यानंतर त्याला अनेक हॉलीवूडपटांच्या ...
ब लीवूड अभिनेता अली फजल आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजू लागला आहे. ‘फास्ट अँड फ्युरिअस ७’ चित्रपटात काम केल्यानंतर त्याला अनेक हॉलीवूडपटांच्या आॅफर मिळाल्या होत्या. सध्या अमेरिकेत गाजत असलेल्या इमिगे्रशन या मुद्यावर आधारित त्याचा आगामी हॉलीवूडपट ‘फॉर हिअर आॅर टू गो’ लवकरच अमेरिकेत प्रदर्शित होत आहे.
अमेरिकेतचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासितांवर घातलेल्या जाचक अटींमुळे तेथे इमिग्रेशनचा मुद्दा तापलेला आहे. अनेक उदारमतवादी विचारसरणींचे लोक ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी रस्त्यांवर उतरत आहेत. विदेशातील लोकांना अमेरिकेत प्रवेश मिळवण्यासाठी किती अग्निदिव्यातून जावे लागते याचे विनोदीशैलीतून दर्शन घडविणारा हा चित्रपट असणार आहे.
तसे पाहिले तर दोन वर्षांपूर्वीच अलीने या सिनेमाची शूटींग पूर्ण केली होती. परंतु तो इतके दिवस रिलीज होऊ शकला नाही. असे होणे निर्मात्यांच्या पथ्यावर पडले. अली चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असून २००८ साली आलेल्या जागतिक मंदीच्या काळात विदेशी नागरिकांना इमिग्रेशनबाबत सहन कराव्या लागणाऱ्या समस्यांवर हा चित्रपट आधारित आहे.
►ALSO READ: अली फजल गिरवतोय जुडी डेंचकडे अॅक्टिंगचे धडे
अलीचे पात्र अमेरिकेतील सिलीकॉन व्हॅलीमध्ये एका गलेगठ्ठ पगाराच्या नोकरीसाठी येते मात्र मंदीमुळे त्याचे हे स्वप्न भंग होते आणि मग सुरू होते त्याची साडेसाती. एकदम वेगळ्या प्रकारे हा मुद्दा हाताळण्यात आल्याचे अली सांगतोय. येत्या मार्च महिन्याच्या शेवटी हा चित्रपट अमेरिकेत रिलीज होणार आहे.
त्याच्या मते, अमेरिकेत सध्या असलेली परिस्थिती आणि चित्रपटाचे प्रदर्शन हा निव्वळ योगायोग असून इमिग्रेशनची समस्या फार पहिल्यापासून चालत आलेली आहे. उलट सध्याची परिस्थिती पाहता आमचा चित्रपट अधिक कालसुसंगत ठरेल. चित्रपटाचे कथानक अनेक सत्य घटनांवर आधारित असून निर्माते माझ्याकडे पटकथा घेऊन आले तेव्हा मला त्याची संकल्पना खूप आवडली होती.
अली सध्या ‘फुकरे’ चित्रपटाचा सिक्वेल ‘फुकरे रिटर्न्स’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. लवकरच जुडी डेंच सोबत ‘व्हिक्टोरिआ अँड अब्दूल’ नावाचा इंग्रजी चित्रपटही यावर्षी प्रदर्शित होणार आहे.
►ALSO READ: अली फझलच्या आगामी चित्रपटाला का होतोय उशीर!