Alia Bhat Daughter : "लेकीचा चेहरा लपवत..." आलिया भटचा राहासोबतचा 'तो' Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 01:00 PM2023-06-02T13:00:32+5:302023-06-02T13:01:09+5:30
आलिया भटची लेक राहा कपूला पाहिलंत का?
अभिनेत्री आलिया भटचे (Alia Bhat) आजोबा नरेंद्र राजदान यांचं काल दीर्घायुष्याने निधन झालं. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आजोबांच्या जाण्याने आलिया दु:खी झाली आहे. आलिया तिच्या आज्जी आजोबांच्या खूप जवळ होती. कायम ती त्यांच्यासोबतचे व्हिडिओ, फोटो शेअर करायची. आलियाने आजोबांच्या निधनानंतर एक भावूक पोस्ट शेअर करत त्यांना 'माझे हिरो' असं संबोधलं आहे. दरम्यान आजोबांच्या निधनानंतर आलिया लेक राहासोबत दिसली. यावेळी तिने राहाचा चेहरा लपवला आणि ती कारमधून उतरली.
आलियाचे आजोबा नरेंद्र राजदान ९३ वर्षांचे होते. संपूर्ण आयुष्य ते दिलखुलासपणे जगले. आपल्या नातवांसोबतही त्यांनी पुरेसा वेळ घालवला अशा आशयाची पोस्ट आलियाने शेअर केली होती. त्यांना तब्येत बिघडल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आजोबा रुग्णालयात असल्याने आलिया आयफा पुरस्कार सोहळ्यासाठीही गेली नाही. तशी पोस्टही तिने सोशल मीडियावर केली होती. दरम्यान रुग्णालयातून घरी आल्यानंतर आलियाचा राहासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात आलिया कारमधून उतरते आणि घरी जाताना दिसते. तेव्हा तिने लेक राहाचा चेहरा लपवला आहे. Instant Bollywood या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्यात. 'हे सेलिब्रिटी आपल्या मुलांचा चेहरा असा लपवतात जसं काय लोक त्यांचा चेहरा बघायला मरत आहेत' अशा कमेंट्स व्हिडिओवर येत आहेत. पण 'नो फोटो पॉलिसी'नुसार आलियाने आत्ताच मुलीला कॅमेऱ्यासमोर आणणार नसल्याचं सांगितलं आहे.