राजामौलींचा बहुचर्चित चित्रपट 'आरआरआर' या दिवशी होणार प्रदर्शित, आलिया भट व अजय देवगण मुख्य भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 17:55 IST2020-02-06T17:54:20+5:302020-02-06T17:55:08+5:30
'आरआरआर' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या याबद्दल

राजामौलींचा बहुचर्चित चित्रपट 'आरआरआर' या दिवशी होणार प्रदर्शित, आलिया भट व अजय देवगण मुख्य भूमिकेत
'बाहुबली' सीरिजमुळे देशातील प्रत्येक सिनेप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेले दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा 'आरआरआर' हा आगामी सिनेमा पाहण्यास प्रत्येकजण उत्सुक आहेत. अखेर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
'आरआरआर' देशभरात पुढील वर्षी ८ जानेवारी २०२१ ला १० भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती आरआरआरच्या की टीमने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून दिली आहे.
#RRR will hit the screens on January 8th, 2021! We know the wait is long but we promise to keep giving you updates in the meanwhile. #RRROnJan8thpic.twitter.com/yObn0Axl9J
— RRR Movie (@RRRMovie) February 5, 2020
अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री आलिया भट हे सुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात आलिया भट आणि अजय देवगण यांच्यासोबत राम चरण आणि जूनियर एनटीआर प्रमुख भूमिकेत आहेत.
तसेच हॉलिवूडचे कलाकार रे स्टीवेन्सन, एलिसन डूडी आणि ओलिविया मॉरिस देखील दिसणार आहेत.
डीवीवी दानय्या द्वारा डीवीवी एंटरटेनमेंट अंतर्गत आणि एस एस राजामौली द्वारा दिग्दर्शित "आरआरआर" देशभरात १० भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.