रणबीर कपूर की आलिया भट... कोणाकडे आहे कोट्यवधींची प्रॉपर्टी, सर्वात श्रीमंत कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 05:03 PM2024-07-23T17:03:35+5:302024-07-23T17:08:28+5:30

Alia Bhatt And Ranbir Kapoor : रणबीर कपूर आणि आलिया भट हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहे. यांचे असंख्य चाहते आहेत. दोघेही चित्रपटांमधून भरपूर कमाई करतात आणि खऱ्या आयुष्यात आलिशान जीवन जगतात.

Alia Bhatt and Ranbir Kapoor net worth luxurious lifestyle who is more rich know everything | रणबीर कपूर की आलिया भट... कोणाकडे आहे कोट्यवधींची प्रॉपर्टी, सर्वात श्रीमंत कोण?

रणबीर कपूर की आलिया भट... कोणाकडे आहे कोट्यवधींची प्रॉपर्टी, सर्वात श्रीमंत कोण?

रणबीर कपूर आणि आलिया भट हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहे. यांचे असंख्य चाहते आहेत. दोघेही चित्रपटांमधून भरपूर कमाई करतात आणि खऱ्या आयुष्यात आलिशान जीवन जगतात. मात्र या दोघांपैकी सर्वात श्रीमंत कोण आहे?, दोघांची एकूण संपत्ती किती आहे? याबाबत जाणून घेऊया...

रणबीर कपूरची संपत्ती

लाइव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूर ३४५ कोटींचा मालक आहे. रणबीर एका चित्रपटासाठी ५० कोटी रुपये घेतो. यासोबतच तो चित्रपटाच्या प्रॉफिटमधून ही परसेंटेज घेतो. 

आलिशान कारचा शौक 

रणबीर लक्झरी कार आणि डिझायनर फॅशन स्टेटमेंटवर खूप खर्च करतो. त्याच्याकडे Rolls Royce, Mercedes Benz GL, Range Rover, Lexus, BMW X6, Audi RS7 आणि Land Cruiser सारख्या गाड्या आहेत. वांद्रे येथे 4 BHK फ्लॅटही आहे. ज्याची किंमत ३५ कोटी रुपये आहे. याशिवाय पुण्यात १३ कोटी रुपयांची अपार्टमेंटही आहे. त्याची एकूण संपत्ती दरवर्षी ४० टक्क्यांनी वाढत आहे.

आलिया भटची कमाई

फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती अंदाजे २९९ कोटी रुपये आहे. ती प्रत्येक चित्रपटासाठी २० कोटी रुपये मानधन घेते. ब्रँड एंडोर्समेंटमधून तिला १-२ कोटी रुपये मिळतात. ती Eternal Sunshine Productions हे फिल्म प्रोडक्शन देखील चालवते. 

एक फॅशन ब्रँडही चालवते. तिने Nykaa, Style Cracker आणि Super Bottoms मध्येही गुंतवणूक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, आलियाचे मुंबईत ३२ कोटी रुपयांचे अपार्टमेंट आहे. तसेच लंडनमध्ये २५ कोटी रुपयांचं घर आहे. तिच्या लक्झरी कारमध्ये BMW 7 आणि Land Rover, Audi A6 यांचा समावेश आहे.

रणबीर आणि आलियाचं लग्न १४ एप्रिल २०२२ रोजी झालं आहे. त्यांना एक मुलगी आहे. राहा असं त्यांनी आपल्या मुलीचं नाव ठेवलं आहे. दोघेही वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत.
 

Web Title: Alia Bhatt and Ranbir Kapoor net worth luxurious lifestyle who is more rich know everything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.