Alia Bhatt and Ranbir Kapoor wedding : रणबीर-आलियाच्या लग्नाच्या चर्चेत ऋषी-नीतू कपूर यांची लग्नाची पत्रिका झाली व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 05:12 PM2022-04-06T17:12:15+5:302022-04-06T17:17:22+5:30
Alia Bhatt and Ranbir Kapoor Marriage : आलिया आणि रणबीरच्या लग्नाचा काउंटडाउन सुरू झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, दोघेही १३ ते १८ एप्रिल दरम्यान सात फेरे घेतील.
Alia Bhatt and Ranbir Kapoor Marriage : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपू लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. दोघांचेही फॅन्स या लग्नाची आतुरतेने वाट बघत होते. आलिया आणि रणबीरच्या लग्नाचा काउंटडाउन सुरू झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, दोघेही १३ ते १८ एप्रिल दरम्यान सात फेरे घेतील.
लग्नानंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्यांचं ग्रॅंड रिसेप्शन होईल, ज्यात बॉलिवूड इंडस्ट्रीचे लोकप्रिय कलाकार सहभागी होतील. लग्नाची तयारी दोन्ही घरात जोरात सुरू आहे. यादरम्यान रणबीर कपूरची आई नीतू कपूर आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे. फॅन्स आता अंदाज लावत आहे की, रणबीर आणि आलियाच्या लग्नाची पत्रिकाही अशीच असणार का? कारण रणबीर कपूर आई-वडिलांप्रमाणेच आरके हाऊसमध्येच लग्न करणार आहेत.
नीतू सिंह आणि ऋषी कपूर यांनी १९८० मध्ये लग्न केलं होतं. दोघांनी आरके स्टुडिओजमध्ये सात फेरे घेतले होते. रिसेप्शन २३ जानेवारी १९८० ला झालं होतं. यात परिवारातील सगळे लोक आणि जवळचे लोक सहभागी झाले होते. जे रिसेप्शन इनव्हाइट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे त्यावर लिहिलं आहे की, 'मिस्टर अॅन्ड मिसेज राज कपूर मुलगा ऋषी कपूर आणि नीतू सिंहच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो'.
तसं पाहिलं तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने आपल्या लग्नाबाबत मौन बाळगलं आहे. अशी चर्चा आहे की, दोघे १३ ते १८ एप्रिल दरम्यान लग्न करतील. त्यांची वेडिंग गेस्ट लिस्टही समोर आली आहे. लग्नात करण जोहर, संजय लीला भन्साली, झोया अख्तर, वरूण धवन, रोहित धवन, सैफ अली खान, करीना कपूर खान, शाहरूख खान सहीत बरेच लोक येतील.