अफेअरच्या चर्चा ताज्या असतानाच डिनर डेटवर गेले आलिया भट्ट आणि रणबीर कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 06:04 AM2018-05-04T06:04:46+5:302018-05-04T11:34:46+5:30

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्यामध्ये काही तरी शिजतच असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. या दोघांच्या अफेअरची चर्चा 'ब्रह्मास्त्र'च्या ...

Alia Bhatt and Ranbir Kapoor went to dinner on the date when the affair was fresh | अफेअरच्या चर्चा ताज्या असतानाच डिनर डेटवर गेले आलिया भट्ट आणि रणबीर कपूर

अफेअरच्या चर्चा ताज्या असतानाच डिनर डेटवर गेले आलिया भट्ट आणि रणबीर कपूर

googlenewsNext
िया भट्ट आणि रणबीर कपूरच्यामध्ये काही तरी शिजतच असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. या दोघांच्या अफेअरची चर्चा 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगपासून सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी बल्गेरियामध्ये चित्रपटाचे पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण करण्यात आले. सध्या चित्रपटाची टीम मुंबईत आहे आणि गुरुवारी रात्री एकत्र डिनरला गेली होती.   

मुंबईतल्या वांद्रातल्या एक रेस्टोरेंटबाहेर रणबीर आणि आलिया स्पॉट झाले. त्यांच्यासोबत ब्रह्मास्त्रचे दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि निर्माता करण जोहरदेखील होता. यावेळी रणबीर निळ्या आणि काळ्या रंगाचे चेक्स वाले शर्ट आणि निळा रंगाची जीन्समध्ये होता तर आलियाने  ग्रे रंगाचा ड्रेस परिधान केला होता. डिनर संपल्यावर करण आणि अयान आपल्या आपल्या गाड्यांनी घरी रवाना झाले तर आलिया आणि रणबीर मात्र एकाच गाडीतून गेले. 

‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर आलिया व रणबीरमधील जवळीक वाढत असल्याची बातमी मध्यंतरी प्रसारमाध्यमांत उमटली होती.  यानंतर  केवळ चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी रणबीर व आलियाच्या लिंकअपची बातमी जाणीवपूर्वक पेरली जातेय, असेही कानावर आले होते. केवळ इतकेच नाही तर रणबीरने म्हणे आलियासोबतच्या लिंकअपच्या बातम्यांवर  नाराजी व्यक्त केली असल्याचेही ऐकीवात आले होते. 



ब्रह्मास्त्र'  चित्रपटात रणबीर आलियाशिवाय बिग बी अमिताभ बच्चनसुद्धा दिसणार आहेत. या चित्रपटात मौनी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मौनी या चित्रपटात नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग  १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. यात एक सुपरहिरो आहे आणि त्याच्याकडे अद्भूत शक्ति आहेत
लवकरच आलियाचा राजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘राजी’ हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित आहे. आलिया यात सहमत नावाच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारते आहे. सहमतचे वडील तिचे लग्न पाकिस्तानच्या एका अधिका-याची लावून देतात. तेथे  राहून सहमतला भारतासाठी हेरगिरी करता येईल, एवढाच या लग्नाचा उद्देश असतो. येत्या ११ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणा-या या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार हिने केले आहे. 

ALSO READ :  रणबीर कपूरबद्दल पहिल्यांदा बोलली आलिया भट्ट, जाणून घ्या!

Web Title: Alia Bhatt and Ranbir Kapoor went to dinner on the date when the affair was fresh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.