Alia Bhatt Deepfake Video : आलिया भट पुन्हा एकदा 'डीपफेक'ची शिकार, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 03:24 PM2024-06-14T15:24:39+5:302024-06-14T15:27:21+5:30
सध्या सोशल मीडियावर GRWM नावाचा ट्रेंड सुरू आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय जगासाठी अडचण बनत चाललं आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी डीपफेक व्हिडीओचा बळी ठरत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट पुन्हा एकदा डीपफेक व्हिडीओची शिकार झाली आहे. तिचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांचा संताप वाढला आहे.
सध्या सोशल मीडियावर GRWM नावाचा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडमधील आलियाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. GRWM म्हणजे (Gate Ready With Me). व्हिडीओमध्ये आलिया कॅमेऱ्यासमोर तयार होताना दिसत आहे. हा व्हिडीओ AI च्या मदतीने बनवण्यात आला आहे. Unfixface नावाच्या इन्स्टा आयडी वरून आलिया भट्टचा डीपफेक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
यापुर्वीही आलियाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. जो अश्लील हावभाव असलेला व्हिडीओ होता. एक मुलगी कॅमेऱ्यासमोर अश्लील चाळे करताना दिसत होती. त्यामध्ये आलियाचा चेहरा मॉर्फ करून वापरण्यात आला होता. आलिया भटसह रणबीर सिंह, रश्मिका मंदान्ना, नोरा फतेही, अक्षय कुमार, सोनू सूद, कतरिना कैफ, काजोल देवगण आणि आमिर खानसह अनेक सेलिब्रिटी डीपफेक व्हिडीओची शिकार झाले आहेत.
आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा 'जिगरा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. आलियाच्या आगामी सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आलिया तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे ओळखली जाते. आलियाने तिच्या १२ वर्षांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आलिया सध्या 'जिगरा' सिनेमाचं शुटींग करत आहे. ती अनेकदा पती रणबीर कपूर आणि लेक राहासोबत स्पॉट होताना दिसते.