काश्मीरी मुलीच्या भूमिकेत दिसणार आलिया भट्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2017 11:38 AM2017-06-05T11:38:40+5:302017-06-05T17:08:40+5:30

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट कॉलिंग सहमत या पुस्तकावर आधारित चित्रपटात झळकणार आहे. मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार ...

Alia Bhatt to appear in Kashmari girl's role | काश्मीरी मुलीच्या भूमिकेत दिसणार आलिया भट्ट

काश्मीरी मुलीच्या भूमिकेत दिसणार आलिया भट्ट

googlenewsNext
लिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट कॉलिंग सहमत या पुस्तकावर आधारित चित्रपटात झळकणार आहे. मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात आलिया एका काश्मीरी मुलीची भूमिका साकारणार आहे. जिचे लग्न एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी होते. 1971साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ती भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना देते. या चित्रपटात आलियासह अभिनेता विकी कौशल ही दिसणार आहे. हा चित्रपट सिक्का या पुस्तकावर आधारित आहे. मेघना गुलजार हिच्या तलवार या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर ती कॉलिंग सहमत घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. मेघना गुलजार दिग्दर्शित तलवार चित्रपटात इरफान खान आणि कोंकणा सेना शर्मा यांच्या मुख्य भूमिका होत्या. मेघनाच्या आगामी चित्रपटाचे नाव अजून निश्चित करण्यात आलेले नाही. पुढील महिन्यापासून या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु होऊ शकते. जंगली पिक्चर आणि धर्मा प्रोडक्शन मिळून या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपट विकी कौशल आलियाच्या पतीची भूमिका साकारणार आहे. विकी कौशलने आपल्या करिअरची सुरुवात मसान या चित्रपटातून केली होती. यानंतर तो रमन राघव 2.0 मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. सध्या तो संजय दत्तच्या बायोपिकमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याची भूमिका काय आहे याचा खुलासा अजून झालेला नाही.  तर आलिया रणबीर कपूरसोबत अयान मुखर्जीच्या ड्रगन चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची शूटिंग ऑगस्टमध्ये सुरु होणार आहे.

Web Title: Alia Bhatt to appear in Kashmari girl's role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.