पीएम मोदींना आलिया भटने विचारला 'असा' प्रश्न, पंतप्रधान हसत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 11:52 AM2024-12-12T11:52:00+5:302024-12-12T11:52:46+5:30

भेटीदरम्यान आलिया भटने पंतप्रधान मोदींना हलक्याफुलक्या पद्धतीने एक प्रश्न विचारला

Alia Bhatt Asked Question To Pm Modi About Music His Response Wins Hearts | पीएम मोदींना आलिया भटने विचारला 'असा' प्रश्न, पंतप्रधान हसत म्हणाले...

पीएम मोदींना आलिया भटने विचारला 'असा' प्रश्न, पंतप्रधान हसत म्हणाले...

Family Met Pm Narendra Modi : हिंदी सिनेसृष्टीतील शोमॅन राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. अभिनेता रणबीर कपूर, रिद्धिमा कपूर-साहनी आणि नीतू कपूर, करिना कपूर खान, सैफ अली खान, करिष्मा कपूर आणि आलिया भट कपूर यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. कपूर कुटुंबाने मोदींना राज कपूर चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण दिलं. 

 राज कपूर यांची 14 डिसेंबर रोजी 100 वी जयंती साजरी होणार आहे.  100 व्या जयंतीनिमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.  पीएमओने एक व्हिडीओ जारी केला आहे. ज्यामध्ये कपूर कुटुंबातील सदस्य पीएम मोदींशी संवाद साधाताना दिसत आहेत. 


भेटीदरम्यान आलिया भटने पंतप्रधान मोदींना हलक्याफुलक्या पद्धतीने एक प्रश्न विचारला, ज्यावर सगळेच हसले. आलिया भट्टने पंतप्रधान मोदींना विचारले की, पंतप्रधान संगीत ऐकतात का? यावर उत्तर देताना पीएम मोदी म्हणाले की "हो, मी गाणी ऐकू शकतो. कारण मला गाणी ऐकायला आवडतात. मला कधी संधी मिळाली तर मी नक्की ऐकतो". दरम्यान राज कपूर यांना 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 13 ते 15 डिसेंबर दरम्यान देशातील 40 शहरांमधील 135 चित्रपटगृहांमध्ये त्यांचे 10 चित्रपट दाखवले जाणार आहेत. 

Web Title: Alia Bhatt Asked Question To Pm Modi About Music His Response Wins Hearts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.