RRR ट्रेलर लॉन्चवेळी रणबीरबद्दलचा 'तो' प्रश्न ऐकताच आलिया भट्टच्या गालावर खुलली कळी, लाजत म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 06:32 PM2021-12-09T18:32:40+5:302021-12-09T18:53:24+5:30

Alia Bhatt :ट्रेलर लॉन्च दरम्यान एका रिपोर्टरने आलिया भट्ट विचारलं की, तुझ्या आयुष्यात R अल्फाबेट लकी फॅक्टर आहे? यावर आलिया लाजते. मग आलियाला बघून सगळे हसू लागतात.

Alia Bhatt Can’t Stop Blushing When Asked If ‘R’ Is Lucky For Her at RRR Trailer Launch | RRR ट्रेलर लॉन्चवेळी रणबीरबद्दलचा 'तो' प्रश्न ऐकताच आलिया भट्टच्या गालावर खुलली कळी, लाजत म्हणाली....

RRR ट्रेलर लॉन्चवेळी रणबीरबद्दलचा 'तो' प्रश्न ऐकताच आलिया भट्टच्या गालावर खुलली कळी, लाजत म्हणाली....

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. आलिया आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफवरून नेहमीच चर्चेत असते. आज तिने तिच्या आगामी RRR सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला. इथे तिला रणबीर कपूर (Ranbir Kapoor) बाबत प्रश्न विचारण्यात आला.

'आरआरआर' ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या सिनेमात आलियासोबत राम चरण (Ram Charan), ज्यूनिअर एनटीआर (Junior NTR) आणि अजय देवगन (Ajay Devgn) यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. ट्रेलर लॉन्च दरम्यान आलियाने मीडियासोबत बोलताना तिला आर बाबत प्रश्न विचारण्यात आला ज्यावर ती लाजली.

काय दिलं आलियाने उत्तर

ट्रेलर लॉन्च दरम्यान एका रिपोर्टरने आलिया भट्ट विचारलं की, तुझ्या आयुष्यात R अल्फाबेट लकी फॅक्टर आहे? यावर आलिया लाजते. मग आलियाला बघून सगळे हसू लागतात. ती म्हणते की, माझ्याकडे याचं काहीच उत्तर नाही. मी इंटेलिजंट बनण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर आलिया म्हणते की, 'हो....आर एक लव्हरी अल्फाबेट आहे. पण ए सुद्धा लव्हली आहे.

'आरआरआर'चा भाग होण्याबाबत आलिया म्हणाली की, राजमौली सरांच्या सिनेमाचा भाग होणं ही माझ्यासाठी मॅजिकल मोमेंट होती. कधीही विचार नव्हता केला की, स्वप्न पूर्ण होईल. सिनेमा रिलीज होण्याची उत्सुकता वाढली आहे. या सिनेमात आलिया सीताची भूमिका साकारत आहे.

Web Title: Alia Bhatt Can’t Stop Blushing When Asked If ‘R’ Is Lucky For Her at RRR Trailer Launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.