Alia Bhatt : Cocaine, Kangana Ranaut : Afeem, Katrina Kaif : Smack ; अंडरवर्ल्डमध्ये मादक द्रव्यांच्या व्यापारासाठी बॉलिवूड कलावंताच्या नावाचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2017 08:06 PM2017-01-01T20:06:01+5:302017-01-01T20:27:56+5:30
बॉलिवूडचा व अंडरवर्ल्डचा संबंध असल्याच्या बातम्या मागील दशकात खूप चर्चेत होत्या. काही चित्रपट निर्माते व अभिनेते अंडरवर्ल्डसोबत संबंध ठेऊन ...
बॉलिवूडचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम बॉलिवूडमध्ये राज्य करीत होता असेही सांगण्यात येते. दरम्यान बॉलिवूडला उद्योगाचा दर्जा मिळाल्यावर अंडरवर्ल्डचा हस्तक्षेप कमी झाला असल्याचे मानले जात होते. पण बॉलिवूड सेलिब्रेटींच्या नावाचा वापर मादक पदार्थांच्या तस्करी, व्यवहार व विक्रीसाठी केला जात असल्याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे.
बॉलिवूड चित्रपटांमध्ये वापरले जाणारे खोका व पेटी हे शब्द आपण चित्रपटात ऐकले आहेत. १ कोटी रुपयांसाठी खोका व १ लाख रुपयांसाठी पेटी हा शब्द वापरला जातो हे आता सर्वमान्यच आहे. यासोबतच सुपारी (हत्या करण्याचा करार/ कॉन्ट्रॅक्ट), लंबी (एके -४७), नौ नंबर की चप्पल (९ एमएमची पिस्टल) अशा असंख्य शब्दाचा वापर केला जातो.
मादक पदार्थांचा वापर करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्याचा नावाचा उल्लेख क रीत असल्याची बातमी हिंदुस्थान टाईम्सने प्रसिद्ध केली आहे. या बातमीनुसार, मादक पदार्थांच्या व्यापारात ‘सुल्तान को फोन करने भेज रहां हू’ याचा अर्थ मादक पदार्थांना घेण्यासाठी प्रमुखाला पाठवित आहे अशा अर्थाने वापरण्यात येतो. कधी कधी ‘सुल्तान नेहमी उशीरा पोहचतो’ किंवा ‘सुल्तान बॉक्स आॅफिसवर हिट ठरला’ असेही शब्दप्रयोग केले जातात. मुंबई पोलीस अशा शब्दांचे अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांनी काढलेले मादक पदार्थांच्या व्यापारातील शब्द हे बॉलिवूड अभिनेत्याच्या नावावर आहेत.
सुल्तान : म्होरक्या/ मुख्य व्यक्ती/ प्रमुख
रणवीर सिंग : फेरीवाला/ छोटा व्यापारी
रणबीर कपूर : होस्ट / आयोजक / संग्राहक
आलिया भट्ट : कोकेन
कंगणा राणौत : अफीम / अफू
कॅटरिना कैफ : तडका/ नाकाने ओढणारा मादक पदार्थ
प्रियांका चोप्रा : एलएसडी
नर्गीस फाखरी : एस्केटी