भाकित : लग्नानंतर आलियाचा रणबीरवर असेल ‘फुल्ल कंट्रोल’; घरच्यांनी लुडबूड केली तर...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 01:28 PM2022-04-08T13:28:16+5:302022-04-08T13:33:35+5:30
Ranbir Alia Wedding : लग्नानंतर आलिया भट व रणबीर कपूरचं वैवाहिक आयुष्य कसं असेल? वाचा, टॅरो कार्ड रीडरचं भाकित
आलिया भट व रणबीर कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 15 एप्रिलच्या रात्री वा 16 एप्रिलला सकाळी हे कपल लग्नगाठ बांधणार असल्याचं मानलं जातंय. साहजिकच रणबीर व आलियाचे फॅन्स क्रेझी झाले आहेत. या लग्नाबद्दल जाणून घेण्यास सगळेच उत्सुक आहेत. पण ही बातमी रणबीर-आलियाच्या लग्नाबद्दल नसून लग्नानंतरच्या वैवाहिक आयुष्याबद्दलची आहे. होय, लग्नानंतर आलिया व रणबीरचं आयुष्य कसं असेल? हा या बातमीचा विषय आहे.
‘इंडिया टुडे’ने सेलिब्रिटी टॅरो कार्ड रीडर दिव्या पंडित यांच्या हवाल्यानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. लग्नानंतर या कपलचं वैवाहिक आयुष्य कसं असेल? याबद्दल दिव्या पंडित यांनी भाकीत केलं आहे.
रणबीर व आलियाचं प्रेम ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर बहरलं. 2018 मध्ये सोनम कपूरच्या रिसेप्शनमध्ये दोघांनीही कपल म्हणून एन्ट्री घेतली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तेव्हापासून आजपर्यंतच्या पाच वर्षांत आलिया-रणबीरचं प्रेम दिवसांगणिक वाढतं गेलं आणि लग्नापर्यंत येऊन ठेपलं.
लग्नानंतर रणबीरवर असेल आलियाचा कंट्रोल...
टॅरो कार्ड रीडर दिव्या पंडित म्हणाल्या, रणबीर व आलिया दोघंही एकमेकांसोबत अतिशय कम्फर्टेबल आहे. रिलेशनशिपमध्ये आल्यापासून दोघांचाही बॉन्ड इमोशनल कमी आणि प्रॅक्टिकल अधिक राहिला आहे. लग्नानंतर रणबीरवर पूर्णपणे आलियाचा कंट्रोल असेल. जी चांगली गोष्ट आहे. मी 100 टक्के दाव्यानं सांगणार नाही, पण माझ्यामते, दोघांचं वैवाहिक आयुष्य अॅव्हरेज असेल. लग्नानंतरच्या करिअरबद्दल सांगायचं तर आलिया तिच्या करिअरमध्येही रूल करेल आणि रॉक करेल. याऊलट रणबीरला त्याच्या करिअरमध्ये बरीच मेहनत घ्यावी लागेल. रणबीर काही काळापासून मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. त्याला पुन्हा एकदा चमकण्यासाठी वेळ लागेल. पण आलिया आत्ता चमकतेय, तशीच चमकत राहिलं.
दोघांच्या कुटुंबांची लुडबूड...
दिव्या पंडित पुढे म्हणाल्या की, रणबीर व आलिया एकमेकांवर प्रेम करतात. पण लग्नानंतर त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये त्यांच्या कुटुंबाची लुडबूड राहिल. आमच्या संसारात लुडबूड करू नका, असं दोघांना आपआपल्या कुटुंबाला सांगावं लागेल. दोघांनाही इमोशनल आणि प्रॅक्टिकल असं संतुलन साधावं लागेल. आलिया खूप भावुक आहे. तिला तिच्या भावनांवर नियंत्रण मिळवावं लागेल आणि रणबीरला त्याच्या भावना खुलेपणानं व्यक्त करणं शिकावं लागेल. दोघंही मुलांचं प्लॅनिंग करतील. पण इतक्यात नाही. कदाचित दोन वर्षानंतर हे कपल बेबी प्लान करू शकतं.