पहिल्याच भेटीत आलिया भट पडली रणबीर कपूरच्या प्रेमात, संजय लीला भन्साळींच्या सेटवर झाली होती भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 01:56 PM2022-04-11T13:56:17+5:302022-04-11T13:56:58+5:30

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) येत्या काही दिवसांत लग्नबेडीत अडकणार आहेत. या दोघांची लव्हस्टोरी चित्रपटापेक्षा कमी नाही. रणबीरला पहिल्यांदा पाहून आलिया प्रेमात पडली आणि आता दोघेही लवकरच एकमेकांचे होणार आहेत.

Alia Bhatt fell in love with Ranbir Kapoor on the first date, Sanjay Leela met on the set of Bhansali | पहिल्याच भेटीत आलिया भट पडली रणबीर कपूरच्या प्रेमात, संजय लीला भन्साळींच्या सेटवर झाली होती भेट

पहिल्याच भेटीत आलिया भट पडली रणबीर कपूरच्या प्रेमात, संजय लीला भन्साळींच्या सेटवर झाली होती भेट

googlenewsNext

आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor)च्या लग्नाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघांच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले आहेत. या जोडप्याने त्यांच्या लग्नाबाबत मौन बाळगले असले तरी त्यांच्या लग्नाच्या तारखेपासून ते ठिकाणापर्यंतची माहिती समोर आली आहे. रणबीर आणि आलियाची प्रेमकहाणी कशी सुरू झाली ते आज जाणून घेऊया.

रणबीर कपूरचे सुरुवातीपासूनच आलिया भट क्रश होती आणि त्याने करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये तिच्यावरील प्रेम व्यक्त केले होते. आलिया तिच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये गेली होती. शोमध्ये करण जोहरने तिला विचारले, 'तुला तुझ्या लग्नाच्या स्वयंवरमध्ये कोणत्या तीन कलाकारांना पाहायला आवडेल'. यावर आलियाने सर्वप्रथम रणबीर कपूरचे नाव घेतले. त्यानंतर सलमान खान आणि आदित्य रॉय कपूर यांची नावे घेतली होती. 
यानंतर करण जोहरने आलियाला पुन्हा विचारले की तिला कोणासोबत इंटिमेट सीन करायला आवडेल आणि कोणासोबत लग्न करायचे आहे. तेव्हाही तिने रणबीर कपूरचे नाव घेतले. 

अशा प्रकारे पहिल्यांदा भेटले आलिया-रणबीर 
आलिया भट आणि रणबीर कपूरची प्रेमकहाणी संजय लीला भन्साळीच्या सेटवर घडली. आलिया भटने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने रणबीर कपूरला २००५ मध्ये पहिल्यांदा पाहिले होते आणि 'तेव्हा मला पहिल्यांदा रणबीरवर क्रश झाले होते.' तिने सांगितले होते की, जेव्हा मी संजय लीला भन्साळींच्या 'ब्लॅक' चित्रपटासाठी ऑडिशन देत होते तेव्हा रणबीर तेथे असिस्टंट म्हणून काम करत होता. त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच मी त्याच्या प्रेमात पडली होती.

असे अफेअरच्या चर्चेला आलं उधाण
आलिया आणि रणबीरच्या अफेअरच्या चर्चा दोघांनी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट साइन केल्यापासून सुरू झाल्या आहेत. सोनम कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच एकमेकांचा हात हातात घेतल्यानंतर त्यांच्या नात्याच्या बातम्यांना आणखीनच हवा मिळाली. यानंतर आलिया अनेकदा रणबीर कपूरच्या कुटुंबासोबत दिसली. हळूहळू आलिया कपूर कुटुंबाची आवडती बनली आणि आता ती या कुटुंबाचा एक भाग होणार आहे.

Web Title: Alia Bhatt fell in love with Ranbir Kapoor on the first date, Sanjay Leela met on the set of Bhansali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.