आलियाच्या मैत्रिणींनी रणबीर कपूरचा खिसा केला रिकामा, ‘या’ लेटरवर आहे शूज लपवण्याची रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 12:46 PM2022-04-20T12:46:00+5:302022-04-20T12:58:26+5:30

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding Unseen Photos: सोशल मीडियावर रणबीर व आलियाच्या लग्नाचे एक ना अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यातला एक फोटो सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय.

alia bhatt friends took 12 lakh each from ranbir kapoor in juta chhipai | आलियाच्या मैत्रिणींनी रणबीर कपूरचा खिसा केला रिकामा, ‘या’ लेटरवर आहे शूज लपवण्याची रक्कम

आलियाच्या मैत्रिणींनी रणबीर कपूरचा खिसा केला रिकामा, ‘या’ लेटरवर आहे शूज लपवण्याची रक्कम

googlenewsNext

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding Unseen Photos: रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) व आलिया भटचा (Alia Bhatt ) लग्नसोहळा थाटात पार पडला. या विवाह सोहळ्याची चर्चा अजूनही सुरूच आहेत. सोशल मीडियावर या लग्नाचे एक ना अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यातला एक फोटो सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. होय, फोटोत रणबीर आलियाच्या मैत्रिणींसोबत दिसतोय आणि त्याच्या हातात एक कागद दिसतोय. त्यावर रणबीरची स्वाक्षरी दिसतेय. साहजिकच, हा कागद कसला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तो आहे करारनामा.

मेहण्यांसोबत रणबीरचा एक करार झालायं. करार कसला तर 12 लाख देण्याचा. होय, रणबीरचे बूट लपवण्याच्या कार्यक्रमात आलियाच्या मैत्रिणींनी 11.5 कोटींची मागणी केली होती म्हणे. अखेर 12 लाखांवर सगळ्याजणी मानल्या. पण लग्न झाल्यावर जीजू 12 लाख विसरले तर? मग काय, सगळ्याजणींनी रणबीरकडून तसं लेखी लिहून घेतलं आणि त्यावर रणबीरनं स्वाक्षरी केली. इतकंच नाही तर हा पुरावा सुरक्षित राहावा, यासाठी स्वाक्षरीच्या कागदासोबत रणबीरसोबत फोटोही काढून घेतला. मी आलियाचा पती... , असं रणबीरने हातात पकडलेल्या कागदावर लिहिलेलं दिसतेय. एकंदर काय तर आलियाची गर्ल गँग मालामाल झाली आणि रणबीरच्या खिसा मात्र रिकामा झाला.

गेल्या 14 एप्रिलला रणबीर व आलिया लग्नबंधनात अडकले. अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. मात्र या लग्नात सर्वांनी धम्माल मज्जा केली. लग्नानंतर रणबीर व आलिया दोघंही आपआपल्या कामावर पतरले आहेत. हनीमूनचा प्लान लांबणीवर टाकत, दोघंही आधी वर्क कमिटमेंट्स पूर्ण करणार आहेत.

Web Title: alia bhatt friends took 12 lakh each from ranbir kapoor in juta chhipai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.