नवऱ्याला ट्रोल करणाऱ्यांना अखेर आलिया भटने सुनावलं, म्हणाली, 'कुटुंबातील सदस्यांबाबत...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 10:20 IST2023-11-06T10:20:16+5:302023-11-06T10:20:52+5:30
आलियाने तिचं टॅलेंट सिद्ध केलं असलं तरी इतर काही कारणांमुळे ती बरेचदा सोशल मीडियावर ट्रोल होत असते.

नवऱ्याला ट्रोल करणाऱ्यांना अखेर आलिया भटने सुनावलं, म्हणाली, 'कुटुंबातील सदस्यांबाबत...'
आलिया भट (Alia Bhatt) बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. लग्न आणि लेकीच्या जन्मानंतरही तिने करिअरलाही तेवढंच प्राधान्य दिलं आहे. नुकताच आलियाने 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. आलियाने तिचं टॅलेंट सिद्ध केलं असलं तरी इतर काही कारणांमुळे ती बरेचदा सोशल मीडियावर ट्रोल होत असते. मध्यंतरी लिपस्टिक प्रकरणावरुनही तिला आणि रणबीरला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या ट्रोलिंगवर आता आलियाने उत्तर दिलं आहे.
आलिया भट कायम शांत असते. तिला आजपर्यंत कधीच चिडलेल्या अवस्थेतही पाहिलं गेलं नाही. ती नेहमीच शांत राहण्याला प्राधान्य देते. आलिया भटने नुकतीच दिल्लीतील एका कार्यक्रमासाठी मुलाखत दिली. यावेळी तिला सततच्या ट्रोलिंगबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आलिया म्हणाली,'माझ्याकडे तक्रार करण्यासारखं काहीच नाहीए. त्यामुळे मी ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही. पण कधी कधी या गोष्टी हैराण करतात. मी स्वत:ला खूप नशिबवान समजते की मला हे यश बघायला मिळत आहे.'
ती पुढे म्हणाली,'स्वत:बद्दल किंवा कुटुंबाबद्दल वाईट बोललेलं आपण ऐकू शकत नाही. पण म्हणून मी त्यांना उलट उत्तरं देत नाही. जोपर्यंत माझे चित्रपट चांगले चालत आहेत आणि मी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे तोपर्यंत मी काहीच बोलणार नाही. आज मी जे काही आहे ते प्रेक्षकांमुळेच.'
आलिया भट सध्या आगामी 'जिगरा' सिनेमाच्या शूटमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती मुख्य अभिनेत्री असून स्वत:च्याच eternal sunshine निर्मिती अंतर्गत ती सिनेमा प्रोड्युस करत आहे.