Alia Bhatt नं 'डार्लिंग्स'च्या ट्रेलर लाँचवेळी असा लपवला बेबी बंप, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 02:25 PM2022-07-25T14:25:15+5:302022-07-25T14:25:36+5:30

Alia Bhatt : आलिया भटने नुकतेच आगामी चित्रपट डार्लिंग्सच्या ट्रेलर लाँच इव्हेंटला हजेरी लावली. यादरम्यान तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसत होता.

Alia Bhatt hid her baby bump at the trailer launch of 'Darlings', pregnancy glow appeared on her face. | Alia Bhatt नं 'डार्लिंग्स'च्या ट्रेलर लाँचवेळी असा लपवला बेबी बंप, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

Alia Bhatt नं 'डार्लिंग्स'च्या ट्रेलर लाँचवेळी असा लपवला बेबी बंप, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

googlenewsNext

आलिया भट (Alia Bhatt) सध्या ग्लो करते आहे. याची अनेक कारणे आहेत. निर्माता म्हणून तिचा पहिला चित्रपट डार्लिंग्स(Darlings)चा ट्रेलर रिलीज झाला आहे. तसेच, लवकरच ती रणबीर कपूर(Ranbir Kapoor)च्या बाळाची आई होणार आहे. ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये आलिया भट पोहोचली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे लागल्या होत्या. आलिया भटने प्रेग्नेंसीची घोषणा केली तेव्हा ती भारतात नव्हती. नुकतेच तिचे प्रोजेक्ट्स पूर्ण करून ती भारतात परतली आहे. दरम्यान, ती सार्वजनिक ठिकाणी फारशी दिसली नाही. मात्र आता डार्लिंग्सच्या ट्रेलर लाँचदरम्यानचे तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. 

आलिया डार्लिंग्सच्या ट्रेलर लाँचमध्ये पिवळ्या रंगाचा शॉर्ट बलून स्टाइल ड्रेस परिधान करून पोहोचली होती. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. आलियाच्या लूज फिट ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप अजिबात दिसत नव्हता. आलियाने थोडे वजन वाढवले ​​आहे आणि ती खूप क्यूट दिसत होती. तसेच तिच्या चेहऱ्यावरील प्रेग्नेंसी ग्लो स्पष्टपणे दिसत होता. या कार्यक्रमात आलियासह, विजय, शेफाली शाह आणि नेहा धुपिया देखील उपस्थित होते.

डार्लिंग्स चित्रपटात आलिया भट देखील अभिनय करताना दिसणार आहे. हा चित्रपट ५ ऑगस्टला  नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शेफाली शाहने आलिया भटच्या आईची भूमिका केली आहे.

आलियाच्या अनेक आगामी प्रोजेक्ट्सची तिच्या चाहत्यांना प्रतीक्षा आहे. हार्ट ऑफ स्टोन या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगनंतर ती नुकतीच भारतात परतली आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात ती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. त्याचवेळी त्याचा बहुप्रतिक्षित ब्रह्मास्त्र हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Alia Bhatt hid her baby bump at the trailer launch of 'Darlings', pregnancy glow appeared on her face.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.