आलिया भट या महिन्यात सुरु करणार दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’चे शूटिंग
By गीतांजली | Published: October 7, 2020 03:27 PM2020-10-07T15:27:13+5:302020-10-07T15:37:40+5:30
आलिया या सिनेमात काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहे.
कोरोना महामारी अनेक सिनेमांच्या शूटिंगचा खोळंबा झाला होता. यात दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा ‘आरआरआर’देखील समावेश होता. 4 ऑक्टोबरपासून ‘आरआरआर’चे शूटिंग हैदराबादमध्ये पुन्हा सुरु करण्यात आले आहे. नोव्हेंबरमध्ये आरआरआरच्या टीमला आलिया भट्ट जॉईन करणार आहे. आलिया या सिनेमात काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी'चे शूटिंग संपल्यावर आलिया आरआरआरच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. यात आलियाची पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. या सिनेमात अजय देवगण ही झळकणार आहे.
So so looking forward to joining the team 💙
— Alia Bhatt (@aliaa08) October 6, 2020
Await #RamarajuforBheemOnOct22! https://t.co/RUi9ZNycCq@ssrajamouli@tarak9999@AlwaysRamCharan@ajaydevgn@oliviamorris891@RRRMovie@DVVMovies#WeRRRBack#RRRMovie
अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. एनटीआर आणि रामचरण पहिल्यांदाच एका सिनेमात एकत्र काम करणार आहेत. राम चरणच्या एन्ट्री सीनवर राजमौलीने 15 कोटी रूपये खर्च केलेत. यानंतर ज्युनिअर एनटीआरच्या एन्ट्री सीनसाठी राजमौलीच्या टीमने 25 कोटींचा बजेट फायनल केला आहे. दोन सीनसाठीचा हा बजेट 40 कोटींच्या घरात आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासात केवळ दोन सीनवर 40 कोटी खर्च करणारा कदाचित हा पहिला चित्रपट आहे.
तामिळ, तेलगू, हिंदी व मल्याळमसह एकूण १० भाषांत ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित होतो. ‘बाहुबली’ सीरिजनंतर ‘आरआरआर’ हा राजमौलींचा पहिला चित्रपट आहे. बाहुबली व बाहुबली 2 या चित्रपटांनी छप्परफाड कमाई केली होती. आता ‘आरआरआर’ हा बिग बजेट सिनेमा किती कमाई करतो ते बघूच.