कंगना राणौतने पुन्हा डिवचले! म्हणे, आलिया भट्ट ही करण जोहरच्या हातचे कळसूत्री बाहुले!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 11:34 AM2019-02-10T11:34:16+5:302019-02-10T11:38:52+5:30
कंगना राणौत हिचा इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीतील लोकांवरचा राग कमी व्हायच्याऐवजी वाढताना दिसतोय. आता तर कंगना आलिया भट्ट हिच्यासारख्या नव्या पिढीतील कलाकारांनाही लक्ष्य करताना दिसतेय.
कंगना राणौत हिचा इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीतील लोकांवरचा राग कमी व्हायच्याऐवजी वाढताना दिसतोय. आता तर कंगना आलिया भट्ट हिच्यासारख्या नव्या पिढीतील कलाकारांनाही लक्ष्य करताना दिसतेय. काही दिवसांपूर्वीच कंगना आलियावर बिथरली होती. ‘इंडस्ट्रीने कायम माझ्याकडे दुर्लक्ष केलेय. माझ्या मुव्ही ट्रायलमध्ये कुणीही येत नाही. पण त्यांची वेळ येते तेव्हा लाजलज्जा सोडून मला फोन करतात आणि बोलवतात.अलीकडे मी सुद्धा त्यांच्या चित्रपटांच्या स्क्रिनिंगला जाणे सोडले आहे. आलियाने मला ‘राजी’चा ट्रेलर पाठवत, तो बघण्याची विनंती केली होती. हा ट्रेलर पाहिल्यानंतर मी मेघना गुलजार आणि आलिया दोघींनाही स्वत:हून फोन केला. पण माझ्या चित्रपटाबद्दल मात्र त्यांच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही. आमिरनेही मला ‘दंगल’ आणि ‘सीक्रेट सुपरस्टार’साठी फोन केला होता. आमिर खान व ट्विंकल खन्ना महिला सक्षमीकरणावर तासन् तास बोलतात. पण मणिकर्णिकासारखा ऐतिहासिक संदर्भ असलेल्या चित्रपटावर त्यांची साध्या एका ओळीचीही प्रतिक्रिया आली नाही. माझ्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी त्यांच्याजवळ वेळ नव्हता. हे सगळे लोक संधीसाधूू आहेत. हे सगळे माझ्याविरोधात कटकारस्थान रचतात,’असे कंगना म्हणाली होती. इतके कमी की काय, म्हणून आता कंगना पुन्हा एकदा आलियावर घसरली.
आलिया ही करण जोहरच्या हातचे कळसूत्री बाहुले आहे, असे कंगना म्हणाली. कुणाच्या हातचे कठसूत्री बाहुले असलेली व्यक्ती कधीच यशस्वी असू शकत नाही. मी आलियाला सांगू इच्छिते की, तू केवळ पैसे कमवण्यासाठी हे सगळे करत असशील तर तुला तुझे काहीही अस्तित्व नाही. तुझ्या यशाला काहीही अर्थ नाही, असे कंगना म्हणाली.
कंगनाच्या या बयानावर आलिया भट्टची प्रतिक्रियाही आली. अर्थात आलियाने हा वाद वाढवण्याऐवजी त्यात न पडणे योग्य समजले. मी कंगनाच्या विधानावर मीडियाशी काहीही बोलणार नाही. यामुळे केवळ वाद वाढेल. असा वाद वाढवण्याऐवजी मी कंगनासोबत पर्सनली बोलेल,असे आलिया म्हणाली. एकंदर काय तर आलियाला हा वाद नकोय. पण कंगना हा वाद किती ताणते, तेच पाहायचे आहे.