Alia-Ranbir Anniversary: कोट्यवधींचा हार, लाख मोलाची साडी; आलिया-रणबीरच्या लग्नात पाण्यासारखा झाला खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 04:23 PM2023-04-14T16:23:18+5:302023-04-14T16:28:13+5:30
साधेपणाने केलेल्या या लग्नात कोट्यवधींचा खर्च झाला. आकडा पाहून येईल तुम्हाला भोवळ.
Alia-Ranbir Anniversary: आज आलिया भट(Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor)च्या लग्नाची पहिली अनिव्हर्सरी साजरी करतायेत. आलिया आणि रणबीर लग्नाआधीपासूनच कपल्स गोल सेट आहेत. चाहते दोघांच्या लग्नाची वाट आतुरतेने पाहत होते. जेव्हा या जोडप्याने गाठ बांधली तेव्हा संपूर्ण मीडियाचे लक्ष त्यांच्याकडेच होते. प्रत्येकाला स्टार्सच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्यायचे होते.
या सगळ्यात बॉलिवूडमधील कपूर आणि भट कुटुंबातील या कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक असलेल्या या स्टार्सचे लग्न अत्यंत साधेपणाने पार पडले. या लग्नात नेमका किती खर्च झाला याचे अपडेट समोर आले आहे. या लग्नात आलिया आणि रणबीरने कोट्यवधींची ज्वॅलेरी परिधान केली होती. लग्नात आलियाने नेसलेल्या साडीची किंमत 50 लाख रुपये होती.
आलियाच्या साडीची किंमत
आलियाने लग्नात सब्यसाचीच्या ब्राइडल वेअर कलेक्शनमधून खास साडी निवडली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या साडीची किंमत 50 लाख रुपये होती.
९ लाखांची होती रणबीरची शेरवानी
रणबीर कपूरच्या शेरवानीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 9 लाख रुपयांची शेरवानी घातली होती. ज्यावर हिऱ्याची बटणं लावली होती. या सिल्क शेरवानीवर खास एम्ब्रॉयडरीही करण्यात आली होती.
रणबीरने आलियाला घातलेल्या मंगळसूत्राची किंमत 15 लाख रुपये होती. या खास प्रसंगी रणबीरने आलियाला घालण्यासाठी 2 कोटी रुपयांची हिऱ्याची अंगठी निवडली होती. आलियाने रणबीरला 48 लाख रुपयांची खास अंगठी दिली. तिच्या गाळ्यातील हार, कानतले झुमके यांची किंमत जवळपास ४ कोटी होती.