आलिया भट-रणबीर कपूरची लेक राहाबाबत ज्योतिष्यांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 01:04 PM2023-01-13T13:04:41+5:302023-01-13T13:05:31+5:30

Ranbir Kapoor-Alia Bhatt's Daughter Raha : राहा अजून एका वर्षाचीही नसली तरी रणबीर आणि आलियाचे चाहते तिचे भविष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. या संदर्भात अनेक नामवंत ज्योतिषांनीही आपापली भविष्यवाणी केली आहे.

Alia Bhatt-Ranbir Kapoor's big astrologer's prediction about daughter Raha, said... | आलिया भट-रणबीर कपूरची लेक राहाबाबत ज्योतिष्यांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले...

आलिया भट-रणबीर कपूरची लेक राहाबाबत ज्योतिष्यांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले...

googlenewsNext

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक कपल म्हणजे आलिया भट (Alia Bhatt) व रणबीर कपूर (Ranbir Kapoor). गेल्या वर्षी रणबीर आणि आलियाने त्यांच्या पहिल्या बाळाचे घरी स्वागत केले. तिचे नाव राहा (Raha) ठेवले आहे. मुलीच्या जन्माची घोषणा करताना आलियाने लिहिले की आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम बातमी आमची मुलगी आली आहे आणि ती एक जादुई मुलगी आहे. राहादेखील इतर स्टारकिड्सप्रमाणेच बॉलिवूडमध्ये करिअर करणार असल्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. आता एका अंकशास्त्र तज्ज्ञांनी राहच्या करिअरबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

राहा अजून एका वर्षाचीही नसली तरी रणबीर आणि आलियाचे चाहते तिचे भविष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. या संदर्भात अनेक नामवंत ज्योतिषांनीही आपापली भविष्यवाणी केली आहे.

अंकशास्त्रज्ञ नवनिधी बधवा यांच्या मते राहा तिच्या आई-वडिलांसाठी आणि तिच्या करिअरसाठी खूप लकी असणार आहे. अंकशास्त्रानुसार, राहाचा मूलांक ६ आहे. सहा या अंकाला अंकशास्त्रात विशेष महत्त्व आहे. राहा बुद्धिमत्तेच्या जोरावर यशस्वी होईल. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा ती कृती करण्याला अधिक महत्त्व देईल.


ज्योतिषांच्या मते राहा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवू शकते आणि यशही मिळवेल. मात्र, राहाचे आगमन रणबीर कपूरसाठीही लकी ठरणार आहे. लवकरच रणबीरला त्याच्या करिअरमध्ये मोठा ब्रेक मिळू शकतो.  आलिया भट व रणबीर कपूरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली आणि नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर सात महिन्यातच त्यांनी आईबाबा झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली.

Web Title: Alia Bhatt-Ranbir Kapoor's big astrologer's prediction about daughter Raha, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.