क्षुल्लक कारणावरून बॉडीगार्डवर संतापली आलिया भट; लोक म्हणाले,‘रणबीर इफेक्ट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 13:10 IST2019-09-19T13:08:16+5:302019-09-19T13:10:27+5:30
ऐरवी आलिया चाहत्यांसोबत सौजन्याने वागताना दिसते. मात्र नुकतेच असे काही झाले की, आलिया तिच्या बॉडीगार्डवर जाम भडकली.

क्षुल्लक कारणावरून बॉडीगार्डवर संतापली आलिया भट; लोक म्हणाले,‘रणबीर इफेक्ट’
आलिया भट सध्या तिच्या चित्रपटांसोबत रणबीर कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत आहे. पण सध्या आलिया तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. ऐरवी आलिया चाहत्यांसोबत सौजन्याने वागताना दिसते. मात्र नुकतेच असे काही झाले की, आलिया तिच्या बॉडीगार्डवर जाम भडकली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आलिया तिच्या फिल्मच्या सेटवर दिसतेय. तिचे बॉडीगार्ड आधीपासून तिची प्रतीक्षा करत आहेत. काहीच क्षणात आलियाची गाडी थांबते आणि बॉडीगार्ड लगेच तिच्याभोवती सुरक्षा कडे बनवतात. आलिया कारमधून उतरते आणि मीडियाकडे पाहून एक क्यूट स्माईल देत पुढे जाऊ लागते. पण यादरम्यान तिचे बॉडीगार्ड तिच्या पुढे निघतात. अर्थात आलिया मागे राहिली हे लक्षात येतात बॉडीगार्ड पुन्हा लगेच मागे येतात. बॉडीगार्डची चूक पाहून आलिया भडकते आणि बॉडीगार्डला फैलावर घेते.
आलियाचा हा व्हिडीओ Viral Bhayani ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करताच क्षणात व्हायरल झाला. पण सोबत आलिया ट्रोल झाली. ‘यांच्या ‘बॉडी’ला ‘गार्ड’ करणा-यांसोबत कसे वागावे याचीही यांना ढब नाही आणि कॅमेºयासमोर मात्र सौजन्याने वागण्याच्या गप्पा मारतात. बॉलिवूडच्या भावा-बहिणींनो आदर काय आहे, हे समजून घ्या,’ असे एका युजरने या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना लिहिले आहे. अन्य एका युजरने हा सगळा ‘रणबीर इफेक्ट; असल्याचे म्हटले आहे. दुसºया एका युजरनेही ‘रणबीर भेटण्याआधी हिचे पाय जमिनीवर होते. आता नखरे दाखवू लागलीय,‘ असे लिहिले.
आलिया सध्या ‘ब्रह्मास्त्र’, ‘सडक’ आणि ‘आरआरआर’ या चित्रपटात बिझी आहे. ‘ब्रह्मास्त्र’ व ‘सडक’चे शूटींग पूर्ण झाले आहे. लवकरच ती ‘आरआरआर’ आणि ‘तख्त’ या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहे.