आलियाचा 'जिगरा' तेलुगूमध्येही होणार रिलीज, सुपरस्टार रामचरणने ट्रेलर शेअर करत केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 11:58 AM2024-09-30T11:58:41+5:302024-09-30T11:59:35+5:30

आलिया भटच्या 'जिगरा'ला साऊथ इंडस्ट्रीतूनही खूप प्रेम मिळत आहे.

Alia bhatt s jigra to also release in Telugu Ramcharan and Rana Dagubatti shared trailer | आलियाचा 'जिगरा' तेलुगूमध्येही होणार रिलीज, सुपरस्टार रामचरणने ट्रेलर शेअर करत केलं कौतुक

आलियाचा 'जिगरा' तेलुगूमध्येही होणार रिलीज, सुपरस्टार रामचरणने ट्रेलर शेअर करत केलं कौतुक

अभिनेत्री आलिया भटचा (Alia Bhatt) आगामी 'जिगरा' सिनेमा ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. 'जिगरा' (Jigra) च्या हिंदी ट्रेलरला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तेलुगुमध्येही सिनेमा प्रदर्शित होणार आहे. साऊथ सुपरस्टार रामचरण (Ramcharan) आणि दिग्दर्शक राजामौली यांनी 'जिगरा' च्या तेलुगू ट्रेलरचे अनावरण केले. तर राणा दगुबत्तीची एशियन सुरेश  एंटरटेन्मेंट  कंपनी 'जिगरा'ला तेलुगूमध्ये प्रेझेंट करणार आहे. 

सुपरस्टार रामचरणने नुकतंच आलियाच्या 'जिगरा' चा तेलुगू ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, 'हा ट्रेलर तुम्हाला इमोशनल रोलरकोस्टरवर घेऊन जाणारा आहे. आलिया आणि संपूर्ण टीमसाठी खूप खूप शुभेच्छा."

तर राणा दगुबत्तीनेही ट्रेलर शेअर करत लिहिले, "fearlessly unstoppable and ready to go' जिगरा ट्रेलर."


आलिया भटच्या 'जिगरा'ला साऊथ इंडस्ट्रीतूनही खूप प्रेम मिळत आहे. यासाठी तिने रामचरण आणि राणाचे आभार मानले. 'जिगरा' सिनेमा भावा बहिणीच्या नात्यावर आधारित आहे. यामध्ये आलियाने सत्या आणि वेदांग रैनाने अंकुर ही भूमिका साकारली आहे. परदेशातील तुरुंगात अडकलेल्या भावाच्या रक्षणासाठी बहीण कोणत्या थराला जाते याची ही कहाणी आहे. वसंत बाला यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून आलिया भटने स्वत: सिनेमाची निर्मितीही केली आहे. तसंच करण जोहरही सिनेमाचा सहनिर्माता आहे. 

आलिया भटने राजामौलींच्या RRR सिनेमात महत्वाची भूमिका साकारली होती. यामध्ये तिची जोडी रामचरणसोबत होती. तेव्हापासूनच आलियाचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. आलियाच्या ब्रह्मास्त्र सिनेमाचंही हैदराबादमध्ये जोरदार प्रमोशन झालं होतं. 

Web Title: Alia bhatt s jigra to also release in Telugu Ramcharan and Rana Dagubatti shared trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.