रणबीर कपूरची बाजू घेते का? आलिया भटची बहीण शाहीनचा खुलासा; म्हणाली,...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 12:39 PM2023-10-22T12:39:42+5:302023-10-22T12:41:52+5:30
आलिया आणि रणबीरच्या लग्नाच मी खूप भावूक झाले होते.
अभिनेत्री आलिया भट (Alia Bhat) बहीण शाहीन भटच्या (Shaheen Bhat) प्रचंड जवळ आहे. दोघी बहिणींमध्ये खूप प्रेम आहे. अनेकदा दोघीही एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात. नुकतंच एका मुलाखतीत शाहीन भटने आलिया आणि रणबीरच्या लग्नाबाबतीत तिच्या भावना शेअर केल्या. तसंच रणबीर कपूरसोबत तिच नातं कसं आहे हेही सांगितलं.
नुकतंच बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत शाहीन म्हणाली, 'आलिया आणि रणबीरच्या लग्नाच मी खूप भावूक झाले होते. आलियाला नवरीच्या रुपात पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या लग्नानंतरही रणबीर आणि माझ्यात काहीच बदललं नाही. कारण आमचा स्वभाव खूपच मिळताजुळता आहे. तसंच अशी कधीच वेळ आली नाही की मला आलिया आणि रणबीरमध्ये एकाची बाजू घ्यावी लागेल.'
आलिया आणि शाहीन नेहमीच एकमेकांसाठी उभ्या असतात. दोघी मिळून Eternal Sunshine हे प्रोडक्शन हाऊस चालवतात. नुकतंच आलिया राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा शाहीनने आनंद व्यक्त केला होता. शाहीनने अनेक वर्ष डिप्रेशनचा सामना केला आहे. या सगळ्यातून ती नुकतीच बाहेर आली असून तिने पुस्तकही लिहिलं आहे. इतकंच नाही तर ती या विषयावर अनेक ठिकाणी सेशनही घेते. आपल्या बहिणीसोबत आलिया नेहमीच उभी असलेली दिसते.