आलिया-रणबीरने गुपचूप उरकलं लग्न?; अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 01:49 PM2022-02-11T13:49:59+5:302022-02-11T13:50:37+5:30

Alia bhatt: अलिकडेच आलियाने एक मुलाखत दिली या मुलाखतीत तिने रणबीर आणि तिच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे.

alia bhatt said ranbir kapoor marriage shocking update | आलिया-रणबीरने गुपचूप उरकलं लग्न?; अभिनेत्रीने केला खुलासा

आलिया-रणबीरने गुपचूप उरकलं लग्न?; अभिनेत्रीने केला खुलासा

googlenewsNext

सध्या कलाविश्वात लग्नसराईचे वारे वाहत आहेत. आतापर्यंत अनेक लोकप्रिय जोड्यांनी साताजन्माची गाठ बांधली आहे. यामध्येच गेल्या कित्येक दिवसांपासून आलिया भट्ट (alia bhatt) आणि रणबीर कपूर (ranbir kapoor) या जोडीची चर्चा आहे. या दोघांच्या लग्नाकडे चाहते आस लावून बसले आहेत. त्यामुळेही जोडी नेमकं कधी लग्न करणार हा एकच प्रश्न त्यांना सातत्याने विचारण्यात येत आहे. यामध्येच एका मुलाखतीत आलियाने धक्कादायक खुलासा केला आहे. तिचं आणि रणबीरचं लग्न आधीच झालंय असं तिने स्पष्ट केलं आहे.

अलिकडेच आलियाने एक मुलाखत दिली या मुलाखतीत तिने रणबीर आणि तिच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधलं आहे. माझं आणि रणबीरचं लग्न तर कधीच झालंय, असं आलिया यावेळी म्हणाली. त्यामुळे या दोघांनी गुपचूप लग्न केलं की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

खरंच आलिया-रणबीरने केलंय लग्न?

"हो. मी काही वर्षांपूर्वीच मनातल्या मनात रणबीरसोबत लग्न करुन मोकळी झाले आहे", असं आलिया म्हणाली. तिच्या या वाक्यानंतर तिचं रणबीरवर किती प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसत होतं. इतकंच नाही तर तिने मनातल्या मनात त्याला नवरा मानण्यासही सुरुवात केल्याचं दिसून आलं.

लग्नाविषयी रणबीरचं मत काय?

काही दिवसांपूर्वीच रणबीर त्याच्या लग्नाविषयी व्यक्त झाला होता. आलियाला माझ्या पत्नीच्या रुपात पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे असं रणबीर म्हणाला होता.

दरम्यान, गेल्या कित्येक काळापासून ही जोडी एकमेकांना डेट करत आहे. लवकरच त्यांची मुख्य भूमिका असलेला ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच आलियाचा गंगुबाई काठियावाडी हा चित्रपटदेखील प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यामुळे आलियाला सध्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

Web Title: alia bhatt said ranbir kapoor marriage shocking update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.