Dear Zindagi Deleted Scene: ‘डिअर जिंदगी’तून डिलीट करण्यात आला होता ‘हा’ सीन, पाहून चाहते म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 06:05 PM2023-04-19T18:05:48+5:302023-04-19T18:06:26+5:30

Dear Zindagi Deleted Scene: होय, हा सीन तुम्हाला चित्रपटात दिसणार नाही. पण आता हा डिलीटेड सीन रेड चिली एंटरटेनमेंटने आपल्या युटयुब चॅनलवर शेअर केला आहे.

Alia Bhatt Shah Rukh Khan Dear Zindagi movie Deleted Scene | Dear Zindagi Deleted Scene: ‘डिअर जिंदगी’तून डिलीट करण्यात आला होता ‘हा’ सीन, पाहून चाहते म्हणाले....

Dear Zindagi Deleted Scene: ‘डिअर जिंदगी’तून डिलीट करण्यात आला होता ‘हा’ सीन, पाहून चाहते म्हणाले....

googlenewsNext

Dear Zindagi Deleted Scene: डिअर जिंदगी हा अभिनेत्री आलिया भटच्या (Alia Bhatt  )सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक चित्रपट. प्रेम, ब्रेकअप्स आणि त्यातून होणारी मानसिक अवस्था, करिअर आणि आयुष्य हे सगळे पैलू आणि या सगळ्यांत मनात चाललेली घालमेल... कायरा आपल्या या मानसिक समस्या घेऊन एका मानसोपचार तज्ज्ञाकडे जाते. डॉ. जहांगीर खान ( Shah Rukh Khan) तिला आयुष्याच्या एका सुंदर वाटेवर आणून सोडतो आणि इथेच त्याचं काम संपतं..., अशी सुंदर कथा गुंफलेला हा सिनेमा सर्वांनाच आवडला होता. २०१६ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा आत्ता आठवायचं कारण काय तर त्यातला एक सीन.
होय, हा सीन तुम्हाला चित्रपटात दिसणार नाही. पण आता हा डिलीटेड सीन रेड चिली एंटरटेनमेंटने आपल्या युटयुब चॅनलवर शेअर केला आहे.

हा सीन आलिया भटवर चित्रीत करण्यात आला होता. पुढे तो सिनेमातून काढून टाकण्यात आला. आता हा सीन पाहून चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. हा सीन चित्रपटात असायला हवा होता, अशा कमेंट्स देत आहेत.

अशी आहे चित्रपटाची कथा
'डिअर जिंदगी' मध्ये कायरा (आलिया) ही सिनेमॅटोग्राफर असते,जिचं ब्रेकअप झाल्यानं ती पूर्णतः काेलमडते. मुंबईतून गोव्यात आई-वडीलांजवळ रहायला आल्यावर तिची भेट होते एका मानसोपचार तज्ज्ञाशी म्हणजेच डॉ. जहांगीर खानशी. कायरा बरी व्हावी म्हणून  तो तिच्याशी मैत्री करतो... एक पेशंट म्हणून तो तिला पाहतो.. कायराला मात्र त्याच्या रुपात एक मित्र, एक सखा भेटतो,ती त्याच्या अधिक जवळ जाऊ पाहते. त्याच्या प्रेमात पडते...पण तिथेही तो आपल्यात फक्त एक निखळ मैत्री आहे याची जाणीव कायराला करून देतो आणि कायरा तिच्या मानसिक संघर्षावर मात करत ती लढाई जिंकते..आयुष्याकडे पाहण्याचा तिचा पूर्ण दृष्टीकोनच बदलतो... 

Web Title: Alia Bhatt Shah Rukh Khan Dear Zindagi movie Deleted Scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.