Alia Bhatt : लेकीच्या जन्मानंतर आलिया भटने शेअर केला पहिला फोटो, झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 12:33 PM2022-11-15T12:33:30+5:302022-11-15T12:33:58+5:30

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आई झाल्यानंतर पहिला फोटो शेअर केला आहे, जो काही मिनिटांतच व्हायरल झाला आहे.

Alia Bhatt shared the first photo after the birth of her daughter, which went viral | Alia Bhatt : लेकीच्या जन्मानंतर आलिया भटने शेअर केला पहिला फोटो, झाला व्हायरल

Alia Bhatt : लेकीच्या जन्मानंतर आलिया भटने शेअर केला पहिला फोटो, झाला व्हायरल

googlenewsNext

आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) नुकतेच आई-बाबा झाले आहेत. आलियाने एका मुलीला जन्म दिला आहे. आलिया आई झाल्यापासून चाहत्यांमध्ये तिच्या मुलीला पाहण्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. कपूर कुटुंबीयांच्या घरी आलेल्या चिमुरडीची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान आलियाने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे, या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.

खरंतर आलिया भटनं इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. जरी हा अस्पष्ट फोटो आहे, ज्यामध्ये आलिया हातात कॉफीचा मग धरून कॅमेरासमोर फोकस करत आहे. या फोटोमध्ये आलियाचे चित्र खूपच अस्पष्ट आहे. फोटोमध्ये आलियाच्या या ब्राऊन कलरच्या कपवर पांढऱ्या रंगात 'मामा' लिहिलेले दिसत आहे. आलियाच्या या अस्पष्ट फोटोमध्ये अभिनेत्रीने तपकिरी रंगाचा सैल टी-शर्ट घातलेला दिसत आहे.


आई झाल्यानंतर आलियाने तिचा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे – It me… अभिनेत्रीची शेवटची पोस्ट तिच्या आई होण्याच्या बातमीबद्दल होती. ही पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने एक अतिशय सुंदर नोट लिहून चाहत्यांसोबत आई झाल्याची माहिती शेअर केली होती.


आलिया भटच्या लेटेस्ट पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. इतकेच नाही तर, आलियाच्या बाळाची झलक दाखवण्याची चाहते मागणी करत आहेत. आलियाच्या या पोस्टला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केले आहे आणि कमेंटही करत आहेत. 

Web Title: Alia Bhatt shared the first photo after the birth of her daughter, which went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.