OMG...! कुणीतरी आवरा रे... आलियाने भर इव्हेंटमध्ये दिली शिवी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 03:14 PM2019-10-15T15:14:37+5:302019-10-15T15:15:16+5:30
बॉलिवूडची क्युट गर्ल आलिया भटने बोलता बोलता शिवी दिल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे.
बॉलिवूडची क्युट गर्ल आलिया भट बऱ्याचदा न विचार करता करणाऱ्या विधानामुळे चर्चेत येत असते. मात्र यावेळेस ती कोणत्या विधानामुळे नाही तर तिने भर कार्यक्रमात शिवी घातली. त्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं आहे.
जिओ मामि फिल्म फेस्टिव्हल २०१९मध्ये करीना कपूर खान व आलिया भटने स्पेशल सेगमेंटमध्ये करण जोहरने बऱ्याच मुद्द्यांवर वक्तव्य केले. आलिया व करीना या दोघींनी एकमेकांचे कौतूक केलं. या इव्हेंट दरम्यान एक वेळ अशी आली जेव्हा आलियाच्या तोंडून शिवी निघाली.
करीना कपूरच्या फॅशनेबल लुक्सचे कौतूक करताना आलियाच्या तोंडून शिवी निघाली. ज्यानंतर आलिया गप्प झाली आणि तोंडावर हात ठेवून हसू लागली. त्यानंतर करीना कपूर व करण जोहरदेखील हसू लागले.
करीना म्हणाली की, हे काय होत आहे. मस्करीत करण म्हणाला की, मी तुला असं मोठे केले आहे. आलियाने सांगितले की, जेव्हा तुम्ही भावनिक होता तेव्हा तूम्ही वहावत जातात.
आलिया म्हणाली की, प्लीझ हे फुटेज कुठे टाकू नका. मला ट्रोलिंगची भीती वाटते. मी नेहमी ट्रोल होते. मी नॉर्मल आहे. कधी कधी काही वाईट सवयी लागतात.
इव्हेंटदरम्यान करण जोहरला वरूण धवनचा फोन येतो आणि आलिया वरूणचा फोन उचलते. आलिया फोनवर म्हणाली की, व्हीडी आम्ही मामि फेस्टिव्हलमध्ये आहोत. फोन स्पीकरवर आहे तर समजूतदारासारखे वक्तव्य कर. मात्र वरूणला विश्वास बसत नाही आणि मस्करीत तो शिवी देतो. त्यानंतर आलिया फोन स्पीकरवरून काढून वरूणला म्हणाली की आम्ही खरोखर मामि फेस्टिव्हलमध्ये आहे.
यावर मज्जा घेत करीना म्हणाली की, तुम्ही पाहू शकता की ही हल्लीची पिढी कशी आहे.