लक्झरी कार सोडून आलिया भटचा रिक्षाने प्रवास, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "फक्त लोकांना दाखवायला..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2024 02:09 PM2024-12-08T14:09:00+5:302024-12-08T14:09:17+5:30
आलिया लक्झरी कार सोडून रिक्षाने प्रवास करताना दिसत आहे. आलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आलिया भट ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. आलिया कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. आता आलियाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आलिया लक्झरी कार सोडून रिक्षाने प्रवास करताना दिसत आहे. आलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन आलियाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आलिया रिक्षाने प्रवास करताना दिसत आहे. तिने शर्ट पँट घातल्याचं दिसत असून चेहऱ्यावर मास्कही लावला आहे. आलियाचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी अभिनेत्रीचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. "पीआर स्टंट", "रिक्षात बसून प्रसिद्धी मागत आहे", "हे फक्त लोकांना दाखवायला आहे", "आलियाचा पब्लिसिटी स्टंट", अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, आलियाने २०१२ साली स्टुडंट ऑफ द इयर या करण जोहरच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करत आलियाने तिच्या अभिनयाची झलक दाखवली. राजी, गंगुबाई काठियावाडी, ब्रह्मास्त्र, गली बॉय यांसारख्या सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या जिगरा सिनेमात ती दिसली होती. आता ती लव्ह अँड वॉर, अल्फा या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.