Ranbir Alia: रणबीरचे केस व्यवस्थित करायला गेली आलिया; त्याने काय केलं Video बघा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 11:56 AM2022-09-15T11:56:48+5:302022-09-15T11:57:25+5:30

Alia Bhatt Ranbir Kapoor Video :रणबीर व आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवरच्या कमेंट्स तर विचारू नका. या कमेंट्स वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही...

Alia Bhatt Tries To Fix Hubby, Ranbir Kapoor's Hair, He Stops Her Mid Video | Ranbir Alia: रणबीरचे केस व्यवस्थित करायला गेली आलिया; त्याने काय केलं Video बघा

Ranbir Alia: रणबीरचे केस व्यवस्थित करायला गेली आलिया; त्याने काय केलं Video बघा

googlenewsNext

 आलिया भट (Alia Bhatt  ) व रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लवकरच आई-बाबा बनणार आहेत. याचा आनंद आहेच. पण ‘ब्रह्मास्त्र’ला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानं दोघांचा आनंद द्विगुणित झाला आहे. केवळ पाचच दिवसांत रणबीर-आलियाच्या या सिनेमाने 150 कोटींचा बिझनेस केला आहे. रणबीर व आलिया यामुळे जाम खुश आहेत. तूर्तास या जोडप्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवरच्या कमेंट्स तर विचारू नका. या कमेंट्स वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही.

व्हिडीओ  धर्मा प्रॉडक्शनच्या ऑफिसबाहेरचा आहे. पापाराझी आलिया व रणबीर दोघांनाही पापाराझी पोझ देण्याची विनंती करतात. पण अचानक आलियाचं लक्ष रणबीरच्या विखुरलेल्या केसांकडे जातं. ती लगेच त्याच्याकडे वळते आणि त्याचे केस व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते. पण कदाचित आपल्या सेट केलेल्या केसांना आलियाने हात लावलेला रणबीरला आवडत नाही. तो लगेच तिचा हात मागे करतो.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आणि तो क्षणात व्हायरल झाला. या व्हिडीओवर युजर्सनी एक ना अनेक कमेंट्स केल्यात. काहींना व्हिडीओतील आलिया व रणबीरची केमिस्ट्री आवडली. पण अनेकांनी यावरून दोघांना ट्रोल करण्याची संधीही साधली.
‘ओह गॉड, किती ड्रामा... रणबीर या मेंटल गर्लला कसा सहन करत असावा?’अशी कमेंट एका युजरने केली. एका चाहतीने रणबीरची तुलना तिच्या बॉयफ्रेन्डशी केली. ‘रणबीर अगदी माझ्या बॉयफ्रेन्डसारखा आहे. जो केसांना स्पर्श केल्यावर वेडा होतो,’ असं तिने लिहिलं. ‘सगळी काळजी यांना पब्लिकसमोरचं दाखवायची असते का?’ अशी कमेंट करत एका युजरने आलिया व रणबीरला ट्रोल केलं. ‘अरे हात लावू नकोस, माझा विग पडेल, असाच वागतोय रणबीर’ अशी मजेशीर कमेंट एका युजरने केली. काही चाहत्यांनी दोघांनी घातलेल्या जीन्सवरूनही त्यांची खिल्ली उडवली. ‘उंदीर पण कुठे कुठे जीन्स कुरतडतात’, अशी कमेंट एका युजरने केली.

आलिया व रणबीरने याचवर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाला दोन महिने होत नाही तोच आलियाने प्रेग्नंसीची घोषणा केली होती. लवकरच आलिया आई होणार आहे. सध्या आलियाच्या बेबी शॉवरची प्लानिंग सुरू आहे. नीतू कपूर व सोनी राजदान दोघीही आलियासाठी ग्रँड बेबी शॉवर प्लान करत आहेत. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला केवळ मुलींनाच एन्ट्री असणार आहे. 

Web Title: Alia Bhatt Tries To Fix Hubby, Ranbir Kapoor's Hair, He Stops Her Mid Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.