आलिया खेळत होती पिकल बॉल, तर बाहेर रणबीर-राहाची मजामस्ती; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 15:38 IST2025-01-15T15:38:20+5:302025-01-15T15:38:41+5:30

बाबा रणबीर आणि राहाचा बाँड खूप खास आहे.

Alia Bhatt was playing pickle ball while Ranbir and Raha were having fun outside Video goes viral | आलिया खेळत होती पिकल बॉल, तर बाहेर रणबीर-राहाची मजामस्ती; व्हिडिओ व्हायरल

आलिया खेळत होती पिकल बॉल, तर बाहेर रणबीर-राहाची मजामस्ती; व्हिडिओ व्हायरल

रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  आणि आलिया भटची (Alia Bhatt) चिमुकली लेक राहा कपूरने (Raha Kapoor) सुरुवातीपासूनच चाहत्यांचं मन जिंकलं आहे. तिच्या गोड चेहऱ्याने सर्वांना प्रेमात पाडलं आहे. तिच्यामध्ये आलियासारखाच क्टुटनेस आहे. तर बाबा रणबीर आणि राहाचा बाँडही खूप खास आहे. राहासोबत असताना रणबीर केवळ बाबाच्या भूमिकेत असतो. लेकीसाठी तो किती प्रोटेक्टिव्ह आहे हेही दिसून येतं. नुकताच त्यांचा एक गोड व्हिडिओ आला आहे जो सध्या सोशल मीडियावर आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरतोय.

आलिया, रणबीर आणि राहा नुकतेच पिकल बॉल खेळायला गेले होते. आलियाचा कोर्टमधील पिकल बॉल खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. तर बाहेर रणबीर राहासोबत खेळताना दिसत आहे. राहा मनसोक्त इकडून तिकडे पळतीये. रणबीर तिला मस्त खेळवतो आहे. राहा बाबासोबत एन्जॉय करत आहे. पळताना मध्येच ती पडते पण मग रणबीर लागलं नाही ना म्हणत तिला उचलून घेतो. तिचे पाय चोळतो. यावेळी रणबीरने घातलेल्या कॅपवर राहाचं हेअरबँडही दिसून येत आहे. वडील-लेकीचा हा क्युट बाँड चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.


या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स आल्या आहेत. 'रणबीर बेस्ट बाबा आहे','ही तर मिनी आलिया','राहाला पळताना पाहून डिअर जिंदगी मधली आलिया आठवली' अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. 

रणबीर-आलिया लवकरच 'लव्ह अँड वॉर' सिनेमात दिसणार आहेत. संजय लीला भन्साळींच्या या सिनेमात विकी कौशलही असणार आहे. या तिघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

Web Title: Alia Bhatt was playing pickle ball while Ranbir and Raha were having fun outside Video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.