राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आलियानं नेसलेल्या साडीची सर्वत्र चर्चा; फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 09:13 AM2024-01-23T09:13:31+5:302024-01-23T09:18:11+5:30
अयोध्या सोहळ्यासाठी आलियाच्या विशेष लूकचं सर्वत्र कौतुक होत आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोमवारी (२२ जानेवरी) राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळालं. विशेष म्हणजे या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक बाॅलिवू़ड कलाकारांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. आता याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी विशेष लक्ष वेधलं ते म्हणजे आलिया भटने.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलिया पोहोचली खास लुकमध्ये पोहचली होती. आलिया भट्टने फिकट हिरव्या रंगाची साडी नेसली होती. आलियाने नेसलेली ही सिंपल लूकची साडी अतिशय खास आहे. आलियाने नेसलेल्या साडीच्या बॉर्डरवर रामायणातील महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख होता. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
alia bhatt wearing a saree which has ramayana depicted on it? wow this is beautiful! pic.twitter.com/6NoZFUBDKI
— 🎞️ (@softiealiaa) January 22, 2024
आलियाने तिच्या साडीसोबत मॅचिंग शाल कॅरी केली. या साडीत आलिया खूपच सुंदर दिसत आहे. आलियासोबतच रणबीरने पारंपरिक लुक केला होता. त्यानं धोती कुर्ता घातला होता. या सोहळ्यात रणबीर आणि आलियासह कतरिना कैफ, विक्की कौशल, कंगना रणौत, माधुरी दीक्षित - श्रीराम नेने, श्लोका आणि आकाश अंबानी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन असे अनेक कलाकार अयोध्येत पोहोचले होते.
अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले आहेत. प्रभू श्री रामाची प्राण प्रतिष्ठा पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर विधीवत मंत्रोच्चाराच्या घोषात झाली आहे.अयोध्येतील ८ एकर जमिनीत हे राम मंदिर उभारलं आहे. या मंदिराचे बांधकाम यावर्षअखेर संपणार आहे. तरीही श्री रामलल्लाचे दर्शन सर्वसामान्यांना काही नियम पाळून घेता येणार आहे. अयोध्येतील राम भक्तांना रामलल्लाच्या दर्शनासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.